कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात तब्बल 817 नवे रुग्ण आढळले, तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 345 जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजार 5 वर पोहोचली आहे. तर जिल्ह्याची एकूण रुग्णांची संख्या 59 हजार 400 इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारी -
कोल्हापूर जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 59 हजार 400 झाली आहे. त्यातील 52 हजार 434 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज (22 एप्रिल) रोजी जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार 5 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1 हजार 961 झाली आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या-
1 वर्षाखालील - 73 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 2169 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 4153 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 31988 रुग्ण
51 ते 70 वर्ष -16771 रुग्ण
71 वर्षांवरील - 4246 रुग्ण
अशी जिल्ह्यात एकूण 59 हजार 400 रुग्णसंख्या झाली आहे.
तालुक्यानुसार रुग्णांची संख्या -
1) आजरा - 1110
2) भुदरगड - 1449
3) चंदगड - 1310
4) गडहिंग्लज - 1809
5) गगनबावडा - 190
6) हातकणंगले - 6074
7) कागल - 1847
8) करवीर - 6636
9) पन्हाळा - 2144
10) राधानगरी - 1366
11) शाहूवाडी - 1541
12) शिरोळ - 2804
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 8600
14) कोल्हापुर महानगरपालिका - 19350
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 3170