ETV Bharat / state

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत पहिला ‘दक्षिणद्वार सोहळा’ संपन्न

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरात या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा बुधवारी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी संपन्न झाला. या दक्षिणद्वार सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी शेकडो भाविकांची गर्दी होत असते. मात्र, मंदिर परिसर कोरोनामुळे बंद असल्याने भक्ताना येता आलं नाही.

author img

By

Published : Aug 6, 2020, 7:57 AM IST

दक्षिणद्वार सोहळा
दक्षिणद्वार सोहळा

कोल्हापूर - श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरात या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा बुधवारी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी संपन्न झाला. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे मंदिर परिसर बंद आहे. त्यामुळे या सोहळ्याला कोणालाही जात येत नसल्याने पहिल्यांदाच भक्ताविना दक्षिणद्वार सोहळा झाला. नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्री स्पर्श करून ते दक्षिणेकडे जाण्याच्या क्रियेला ‘दक्षिणद्वार सोहळा’ असे संबोधले जाते.

दोन दिवसांपासून कोल्हापूरसह जिल्हाभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच धरणांतून होणारा विसर्ग यामुळे येथील कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. कृष्णा नदीच्या पाण्याने शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील मंदिरातील दत्त पादुकांना स्पर्श केला. येथील दत्त मंदिरात बुधवारी रात्री साडे आकरा वाजता नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्रींच्या पादुकांना स्पर्श करून ते दक्षिणेकडे बाहेर पडले, त्यामुळे या वर्षातील हा पहिला ‘दक्षिणद्वार सोहळा’ झाला.

दरम्यान, कोरोनामुळे यावेळी आरती सुद्धा झाली नाही, ना भक्तांचा श्री गुरुदेव दत्त, असा गजर झाला. या दक्षिणद्वार सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी शेकडो भाविकांची गर्दी होत असते. मात्र, मंदिर परिसर कोरोनामुळे बंद असल्याने भक्ताना येता आलं नाही. मात्र, जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, अशी सर्वच भक्त प्रार्थना करत आहेत. दरम्यान गेल्या वर्षी तब्बल 4 वेळा दक्षिणद्वार सोहळा पार पडला होता.

मुख्य मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडण्याऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. तसेच या सोहळ्यात स्नान केलेने मानवाच्या पापाचा ऱ्हास होवून पुण्यप्राप्ती होते अशी भाविकांची धारणा व विश्वास असल्याने या सोहळ्यात स्नान करण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.