सातारा - कोल्हापुरात पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आघाडी धर्माविरोधात बंड पुकारले आहे. 'आमचं ठरलं', असा नाराही त्यांनी दिला आहे. त्यावर शरद पवार यांनी 'ध्यानात ठेवलं', असे प्रत्युत्तर दिले. त्यामुळे आता सातारा आणि माढ्यात आमचं ठरलं, आम्ही ध्यानात ठेवलं, असा सूर दोन्हीकडूनही उमटू लागला आहे.
हा सूर उमटायला कारणही तसेच आहे. साताऱ्यातून काही नगरसेवक आणि माढ्यातून आमदार गोरे यांच्या भूमिकेमुळे "ध्यानात ठेवलं, आमचं ठरलं" असा सूर उमटत आहे. सातारा लोकसभा मतदार संघात नरेंद्र पाटील यांचे कार्यकर्ते आमचं ठरलं, असे बोलत आहेत. तर उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते आम्ही ध्यानात ठेवलं, असे बोलत आहेत.
माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजप-सेनेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माण-खटाव आणि फलटणचा भाग पिंजून काढला आहे. नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांनादेखील सेनेचे काम करायचे आहे, असे आमदार जयकुमार गोरे यांनी म्हटल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोल्हापूरसारखेच स्वरूप माढा आणि सातारा लोकसभा मतदार संघाला आले आहे.