कोल्हापूर - बेळगाव काळ्या दिनानिमित्त कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ आणि चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील हे दोघेही आज मूक सायकल फेरीमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच ते सभेला सुद्धा संबोधित करणार आहेत.
हेही वाचा - भाजपच्या उमेदवाराचा पराभव करणाऱ्या प्रकाश आवाडेंचा भाजपलाच पाठिंबा
काळ्यादिनाच्या निमित्ताने बेळगावमध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संभाजी उद्यान परिसराला पोलीस छावणीचेच स्वरूप आले आहे. दरम्यान, सकाळपासूनच बेळगावमधील मराठी भाषिक काळ्या दिनाचे ब्रीद असलेले काळे टी शर्ट आणि काळ्या पट्ट्या बांधून सायकल फेरीमध्ये सहभागी झाले आहेत.