ETV Bharat / state

...अन् संभाजीराजेंनी मारला नदीत सूर!

author img

By

Published : Apr 15, 2019, 12:01 PM IST

खुद्द राजे नदीमध्ये पोहताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटलेच पण ज्या मुलांसोबत राजेंनी पोहण्याचा आनंद लुटला ती मुलेसुद्धा राजेंकडे फक्त बघतच राहिली.

खासदार संभाजीराजे

कोल्हापूर - उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. गावो-गावी मुले नदी, विहिरीवर पोहत असल्याचे चित्र आता सर्रास पाहायला मिळत आहे. पण या मुलांसोबत नदीमध्ये संभाजीराजे छत्रपतींना पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खुद्द राजे नदीमध्ये पोहताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटलेच पण ज्या मुलांसोबत राजेंनी पोहण्याचा आनंद लुटला ती मुलेसुद्धा राजेंकडे फक्त बघतच राहिली. हा संपूर्ण प्रकार संभाजीराजे चंदगड तालुका दौऱ्यावर असताना पाहायला मिळाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका म्हणजे निसर्गाची मुक्त उधळण झालेले ठिकाण. काजू, फणस, आंबे यांच्या बागा आणि अस्सल ग्रामीण बाज टिकवून ठेवलेला हा तालुका. असे ठिकाण कोणाला आवडणार नाही? कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांचेसुद्धा हे आवडते ठिकाण. अनेकवेळा ते या तालुक्यात वास्तव्यास जात असतात. रविवारी संभाजीराजे चंदगड दौऱ्यावर असताना दुपारच्या वेळी अचानक रस्त्याकडेला राजेंना काही मुले नदीमध्ये पोहोताना दिसली.

खासदार संभाजीराजे मुलांसोबत पोहताना

राजेंनी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितली आणि पोहणाऱ्या मुलांकडे काही वेळ पाहत राहिले. पण त्या लहानग्यांचा पोहण्याचा आनंद पाहून राजेंनासुद्धा पोहण्याचा मोह आवरला नाही. सुरक्षारक्षकांनी मनाई केली तरीही त्यांनी त्यांचे न ऐकता सरळ पाण्यात सूर मारला आणि राजेपण विसरुन लहानग्यांमध्ये एकरुप झाले. खुद्द राजेंना पाहून मुलेसुद्धा आश्चर्यचकित झाली. शिवाय तितकाच आनंदही झाला. नदीच्या थंडगार वाहत्या पाण्यात पोहून राजेंनी विरंगुळा मिळवण्याबरोबरच जनतेसमवेत मुक्त आनंद लुटला. रयतेसमवेत थंडगार पाण्यात डुंबण्याची ओढ त्यांना रोखू शकली नाही. मुलांनीसुद्धा ही संधी साधत संभाजीराजेंसोबत फोटो काढून घेतले.

Intro:अँकर : उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. गावो-गावी मुलं नदी, विहिरीवर पोहत असल्याचे चित्र आता सर्रास पाहायला मिळत आहे. पण या मुलांसोबत नदीमध्ये संभाजीराजे छत्रपतींना पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खुद्द राजे नदीमध्ये पोहताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटलेच पण ज्या मुलांसोबत राजेंनी पोहण्याचा आनंद लुटला ती मुलं सुद्धा राजेंकडे फक्त बघतच राहिली. हा संपूर्ण प्रकार संभाजीराजे चंदगड तालुका दौऱ्यावर असताना पाहायला. Body:व्हीओ : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालूका म्हणजे निसर्गाची मुक्त उधळण झालेलं ठिकाण. काजू, फणस आंबे यांच्या बागा आणि अस्सल ग्रामीण बाज टिकवून ठेवलेला हा तालुका. असे ठिकाण कोणाला आवडणार नाही? कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांचे सुद्धा हे आवडते ठिकाण. अनेक वेळा ते या तालुक्यात वास्तव्यास जात असतात. असेच काल संभाजीराजे चंदगड दौऱ्यावर असताना दुपारच्या वेळी अचानक रस्त्याकडेला राजेंना काही मुलं नदीमध्ये पोहताना दिसली. राजेंनी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितली आणि पोहणाऱ्या मुलांकडे काही वेळ पाहत राहिले. पण त्या लहानग्यांचा पोहण्याचा आनंद पाहून राजेंना सुद्धा पोहण्याचा मोह आवरला नाही. सुरक्षारक्षकांनी मनाई केली तरीही त्यांनी त्यांचे न ऐकता सरळ पाण्यात सूर मारली आणि राजेपण विसरुन लहानग्यांमध्ये एकरुप झाले. खुद्द राजेंना पाहून मुलं सुद्धा आश्चर्यचकित झाली शिवाय तितकाच आनंदही झाला. नदीच्या थंडगार वाहत्या पाण्यात पोहून राजेंनी विरंगुळा मिळवण्याबरोबरच जनतेसमवेत मुक्त आनंद लुटला. रयतेसमावेत थंडगार पाण्यात डुंबण्याची ओढ त्यांना रोखू शकली नाही. मुलांनी सुद्धा ही संधी साधत संभाजीराजेंसोबत फोटो काढून घेतले. Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.