कोल्हापूर - 'कीती बी ताण येत नाही बाण' असे म्हणत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेची खील्ली उडवली आहे. कोल्हापुरातील गारगोटी येथे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
हेही वाचा - रविवारी अमित शाह यांची कोल्हापूरात जाहीर सभा
अमोल कोल्हे म्हणाले, राज्यात आघाडीच्या सभांना मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे 'कीती बी ताण येत नाही बाण' अशीच कुजबुज लोकांमध्ये सुरू आहे. सरकारला जनताच त्यांची जागा दखवल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील गडकोट विकायला काढणाऱ्या सरकारने निर्णय घेतला त्याचवेळी मत मागण्याचा अधिकार आणि निवडणुक गमावली असल्याचेही कोल्हे म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते. अमोल कोल्हे यांनी के. पी. पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन उपस्थितांना केले.