ETV Bharat / state

मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात कोल्हापूरमध्ये मोर्चा - Kolhapur Latest News

मायक्रो फायनान्सच्या मनमानी कारभाराविरोधात आज कोल्हापुरात रिपब्लिकन पार्टीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. खासगी कंपनीवाल्यांची दादागिरी मोडीत काढावी, मायक्रो फायनान्सची संपूर्ण कर्जमाफी करावी, चुकीच्या पद्धतीने होत असलेली वसुली थांबवावी, अन्यथा महिला कायदा हातात घेतील, असा इशारा यावेळी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.

मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात कोल्हापूरमध्ये मोर्चा

author img

By

Published : Feb 15, 2021, 7:46 PM IST

कोल्हापूर- मायक्रो फायनान्सच्या मनमानी कारभाराविरोधात आज कोल्हापुरात रिपब्लिकन पार्टीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. खासगी कंपनीवाल्यांची दादागिरी मोडीत काढावी, मायक्रो फायनान्सची संपूर्ण कर्जमाफी करावी, चुकीच्या पद्धतीने होत असलेली वसुली थांबवावी, अन्यथा महिला कायदा हातात घेतील, असा इशारा यावेळी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.

मायक्रो फायनान्स कंपन्यांनी सर्वसामान्य कष्टकरी महिलांना बेकायदेशीर भरमसाठ कर्ज दिले आहे. कर्जासाठी अपात्र असताना देखील कर्ज देण्यात आले व त्यावर आता भरमसाठ व्याज आकारण्यात येत आहे. कर्जावर आकारण्यात येणारे व्याज, दंड, वसुली एजंटचा चार्ज यामुळे या महिलांना कर्जाच्या पाचपट रक्कम भरावी लागत आहे. त्यामुळे ही वसुली तातडीने थांबवावी व या कंपन्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात कोल्हापूरमध्ये मोर्चा

मोर्चाला दसरा चौकातून सुरुवात

या मोर्चाला दसरा चौक येथून सुरुवात झाली. व्हीनस कॉर्नर, बसंत-बहारमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. दरम्यान बेकायदेशीररित्या दिलेल्या कर्जाची वसुली थांबवावी, जिल्ह्यात संजय गांधी, निराधार देवदासी पेन्शन, श्रावणबाळ योजना व अपंग पुनर्वसनाची पेन्शन दरमहा दोन हजार करावी, सर्व भूमिहीनांना प्रत्येकी पाच एकर जमीन शासनाने कसण्यासाठी द्यावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.