बेळगाव - कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांची शिवसेनेने महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर प्रतिमात्मक अंतयात्रा काढल्यानंतर आता त्याचे पडसाद कर्नाटकात उमटत आहेत. बेळगाव कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या पोस्टरसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
हेही वाचा - मटण महागले असताना 'थर्टी फर्स्ट'च्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शेळ्यांची चोरी
शनिवारी सकाळी कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने भीमाशंकर यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून भीमाशंकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. त्याचेच पडसाद आता कर्नाटकात उमटत आहेत.