ETV Bharat / state

Gram Panchayat Elections Kolhapur : ग्रामपंचायत निवडणुकीमुळे सतेज पाटील व धनंजय महाडिक पुन्हा आमने-सामने - ग्रामपंचायत निवडणूक 2022

कोल्हापुरातील 430 ग्रामपंचायतीसाठी 19 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार (Gram Panchayat Elections Kolhapur) पडली. याठिकाणी सतेज पाटील गटाचे उमेदवार मधुकर चव्हाण यांनी बाजी मारली (Gram Panchayat Elections 2022) होती. यावर महाडिक गटाने शंका उपस्थित केली असून फेर मतदान व्हावे, यासाठी गावात आंदोलन केले. त्यामुळे पुन्हा आता सतेज पाटील व धनंजय महाडिक पुन्हा आमने-सामने आले (Satej Patil against Dhananjay Mahadik) आहेत.

Gram Panchayat Elections Kolhapur
सतेज पाटील व धनंजय महाडिक
author img

By

Published : Dec 29, 2022, 7:35 AM IST

प्रतिक्रिया देताना सतेज पाटील व धनंजय महाडिक

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हापुरात सतेज पाटील व महाडिक गट हे आमने-सामने (Gram Panchayat Elections Kolhapur) होते. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उचगाव ग्रामपंचायतीत सतेज पाटील गटविरुद्ध धनंजय महाडिक गट अशी लढत सुरू होती. येथे चित्रा वाघ देखील प्रचारासाठी येऊन गेल्या. तर यामध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचा ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उचगाव या ग्रामपंचायतीत सतेज पाटील गटाचे उमेदवार केवळ 69 मताने विजय झाले. कोल्हापुरातील 430 ग्रामपंचायतीसाठी 19 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. 21 तारखेला निकाल जाहीर झाला होता.

आरोप प्रत्यारोपाची झडती : यंदा पहिल्यांदाच ग्रामपंचायतच्या निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरील नेते सहभागी झाल्याने अनेक नेत्यांची प्रतिष्ठा कोणाला लागली होती. यामुळे येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. याच निवडणुकीत सतेज पाटील यांना आपला गड राखण्यात यश (Gram Panchayat Elections 2022) मिळाले. याच विषयावर आता महाडिक गटाने शंका उपस्थित केली असून फेर मतदान व्हावे, यासाठी गावात आंदोलन करण्यात आले आहे. यावरून आता पुन्हा पाटील आणि महाडिक आमने-सामने आले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची झडती पुन्हा सुरू झाली (Satej Patil against Dhananjay Mahadik) आहे.

पुर्ननिवडणूक घेण्यासाठी आंदोलन : सतेज पाटील गटाचे (MLA Satej Patil) उमेदवार मधुकर चव्हाण हे केवळ 69 मतांनी विजयी झाले. याच विषयावर धनंजय महाडिक गटाने (MP Dhananjay Mahadik) शंका उपस्थित करत पुर्ननिवडणूक घेण्यासाठी आंदोलन केले. याबाबत सतेज पाटील यांनी विजय जसा साजरा करतात, तसा पराजय ही पचवण्याची ताकद ठेवावी, असा टोला धनंजय महाडिक यांना लगावला. पराजय पचवायचा आम्हाला कोणी सांगायची गरज नाही. आता आमचा उदय झाला आहे, असे म्हणत फार त्यांना पत्र नव्हते. म्हणून ते सहा महिने अज्ञातवासात गेले होते, असा टोला धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना लगावला आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमुळे आता कोल्हापूरचे वातावरण गरम होत असून त्यामुळे सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे दोघे पुन्हा आमने-सामने आले (Gram Panchayat Elections) आहेत.

उचगाव ग्रामपंचायत निवडणूक निकाल : दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कोल्हापूर शहरालगत असलेल्या उचगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचार केला होता. याठिकाणी काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार मधुकर चव्हाण यांनी बाजी मारली होती. एकूण तीन वेळा फेर मतमोजणीनंतर हे उमेदवार निवडून आल्याचे घोषित करण्यात आले होते. अगदी कमी मतांच्या फरकाने निवडून आल्याने स्वतः विजयी उमेदवाराने फेर मतमोजणीसाठी विनंती केली होती. त्यानंतर पुन्हा भाजपच्या पराभूत उमेदवाराने फेर मतमोजणीसाठी मागणी केली होती. त्यानंतर विजयी उमेदवार जाहीर करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.