ETV Bharat / state

मागील वर्षात कामगारांना कवडीची मदत नाही, मग आता काय देणार - चंद्रकांत पाटील

महिनाभर टाळेबंदी करणार असाल तर सर्वसामान्यांना किराणा साहित्य व भाजी मोफत देणार असल्याची घोषणा करा. जर याची व्यवस्था न करता टाळेबंदी करणार असाल तर आम्हाला टाळेबंदी मान्य नसल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Apr 13, 2021, 5:25 PM IST

Updated : Apr 13, 2021, 6:34 PM IST

कोल्हापूर - गतवर्षी झालेल्या टाळेबंदीत राज्य सरकारने कामगारांना कवडीची मदत दिली नाही. मुश्रीफ यांनी, कामगारांचे डोळे विस्फारुन जातील असे पॅकेज देऊ, असे म्हणाले होते. मागील वर्षी टाळेबंदीमध्ये कामगारांना कवडी मिळाली नाही, मग आता काय देणार, असा सवाल भाजपचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे ते कोल्हापुरात बोलत होते.

बोलताना चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोना हा विषाणू लवकर संपणार नाही. लोकांची काळजी घेऊन जनजीवन सुरळीत ठेवले पाहिजे. प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांना आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे. असंघटीत कामगारांना काहीच पॅकेज वर्षभरात दिले गेले नाही. महिनाभर टाळेबंदी करणार असाल तर सर्वसामान्यांना किराणा साहित्य व भाजी मोफत देणार असल्याची घोषणा करा. जर याची व्यवस्था न करता टाळेबंदी करणार असाल तर आम्हाला टाळेबंदी मान्य नसल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

शुक्लांची बदली तीन महिन्यांपूर्वीच व्हायला हवी होती

आयपीएस अधिकारी शुक्ला यांच्या बदलीवरून चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांच्या बदलीवरून संशय व्यक्त करणार इतका मी तज्ज्ञ नाही. ही त्यांची रूटीन बदली आहे. त्यांची बदली ही तीन महिन्यांपूर्वीच व्हायला हवी होती. पण, आपल्याकडे खूप हुशार लोक आहेत, त्यांनीच सांगावे त्यांची बदली का झाली, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केले 'हे' आवाहन

Last Updated : Apr 13, 2021, 6:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.