कोल्हापूर - सध्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोट निवडणुकीत जाहीर झाली आहे. ( Kolhapur North Assembly Byelection ) यामध्ये आता काँग्रेस विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडी आता ताकदीने उतरली आहे. कालच महविकास आघाडीचा प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा महामेळावा घेण्यात आला होता. तर आज सकाळी पालकमंत्री सतेज पाटील ( Satej Patil ) यांच्या नेतृत्वाखाली एका खासगी हॉटेलमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक संपन्न झाली. यानंतर पालकमंत्री सतेज पाटील आणि शिवसेना खासदार संजय मंडलिक ( MP Sanjay Mandlik ) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी कोल्हापूरची पोटनिवडणूक म्हणजे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच आहे. यात गेली अडीच वर्षे केलेल्या कामाच्या जोरावर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होण्याची खात्री व्यक्त केली. तर खासदार संजय मंडलिक यांनी कोणत्याही परिस्थितीत शिवसेनाही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सोबत असून मातोश्रीवर आलेल्या आदेशाचे पालन तंतोतंत केले जाईल, असे माध्यमांना सांगितले. दरम्यान, नाराज असलेले राजेश क्षीरसागर यांना आज मातोश्री वरून निमंत्रण आल्याने ते तिकडे रवाना झाले आहे. पक्षप्रमुख त्यांची नाराजी दूर करतील, असा विश्वास ही यावेळी व्यक्त करण्यात आला.
राजेश क्षीरसागर यांची नाराजी आज दूर होईल -
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक लागली आहे. ही जागा काँग्रेसला दिल्याने शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे नाराज झाले होते. तर त्यांनी काल मोठे शक्ती प्रदर्शन करत ही नाराजगी दाखवून सुद्धा दिली. यामुळे राजेश क्षीरसागर यांना मातोश्रीवर बोलवण्यात आले आहे. ते मुंबईला रवाना झाले आहेत. तर यावर पालकमंत्री सतेज पाटील आज माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, राजेश क्षीरसागर यांची नाराजी दूर झाली असून त्यांनी काल त्यांच्या मेळाव्यात देखील म्हंटले आहे आज पक्षप्रमुख यांच्यासोबत त्यांची बैठक असून राहिलेली नाराजी सुद्धा दूर करतील असे ते म्हणाले आहेत. तसेच ही निवडणूक महविकास आघाडी चे सत्य विरुद्ध भाजप चा खोटेपणा असल्याचे ही त्यांनी म्हटले.
हेही वाचा - VIDEO : शिवजयंतीवरुन राजकारण; विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये ताळमेळाचा घोळ
मातोश्रीवरुन आलेला निर्णय तंतोतंत पाळणार -
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमी काँग्रेस पालकमंत्री सतेज पाटील आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आज मेळावा पार पडला. यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मातोश्रीवरुन आलेला निर्णय हा तंतोतंत पाळणार आहे. जे काय मनात खदखद वगैरे होती हे सर्व बाजूला ठेवून निवडणुकीचे रणनीती आखण्यासाठी आजची ही बैठक पार पडली.