ETV Bharat / state

मंत्री हसन मुश्रीफ-अण्णा हजारे भेट; ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीवर साधला संवाद - Anna Hazare on appointment Grampanchayat administrator

आठवडाभरापूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा नवीन कायदा झाला आहे. त्यासंदर्भात दोनच दिवसापूर्वी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून खासगी व्यक्तीच्या नियुक्तीबाबत नापसंती व्यक्त केली होती.

anna hajare
मंत्री हसन मुश्रीफ-अण्णा हजारे भेट; ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीवर साधला संवाद
author img

By

Published : Jul 25, 2020, 8:39 AM IST

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि ज्येष्ठ सामाजिक नेते अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे शुक्रवारी भेट झाली. दुपारी झालेल्या तासभराच्या चर्चेत ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्यासह लोकसहभागातून ग्रामविकास व समृद्ध खेडी या विषयांवर चर्चा केली. लोकसहभागातून ग्रामविकास या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी दोघेही पुन्हा भेटणार आहेत. यावेळी अण्णा हजारे यांनी मुश्रीफ यांना ग्रामविकास, गावाच्या विकासात लोकसहभाग, ग्रामसभेचे अधिकार, समृद्ध गावे या विषयांवरील पुस्तके भेट दिली आहेत.

दरम्यान, आठवडाभरापूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा नवीन कायदा झाला आहे. त्यासंदर्भात दोनच दिवसापूर्वी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून खासगी व्यक्तीच्या नियुक्तीबाबत नापसंती व्यक्त केली होती. मंत्री मुश्रीफ यांनीही पत्र लिहून अण्णा हजारे यांना लवकरच आपली भेट घेऊन सविस्तर चर्चा करू, असे पत्रात लिहिले होते. त्यानुसार अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री मुश्रीफ यांनी राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांची भेट घेतली. या भेटीत अण्णा हजारे यांनी महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे निसर्ग, जमीन, पर्यावरण या साधन संपत्तीवरच आपण गावे समृद्ध करू शकतो, असे सांगितले.

अण्णांची नाराजी आणि मुश्रीफांचे स्पष्टीकरण -

भेटीत अण्णा हजारे यांनी खासगी व्यक्तीच्या ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्याबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, कोरोनासारख्या महामारीच्या परिस्थितीत गावगाडा सुरुळीत चालण्यासाठी असाधारण परिस्थितीत हा कायदा करावा लागल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायालयीन बाबीबाबत सुद्धा मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.