कोल्हापूर - राज्य सरकारच्या विरोधात सातत्याने काय तर करत राहायचे हाच भाजपचा प्रयत्न आहे. सत्तेसाठी कोणतेच प्रयत्न सफल होत नाहीत म्हणून परमेश्वराला भाजप हाक देत आहे, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. राज्यातील मंदिरे सुरू करण्यात यावी, यासाठी भाजपच्या वतीने शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. या आदोलनावरुन मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापुरात भाजपवर टीका केली.
भावना गवळींच्या संस्थांवर टाकलेले छापे चुकीचे -
ते पुढे म्हणाले, परिवहनमंत्री अनिल परब आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाल्याबद्दल मी अनेक वेळा भूमिका स्पष्ट केली आहे. हे भाजपचेच कटकारस्थान आहे, असेही अनेक वेळा मी सांगितले आहे. भाजप महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू करत आहे. आत्तापर्यंत मुंबई पोलीसचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर सहा गुन्हे झाले. मात्र, कारवाई केलेली नाही. तर भाजप सत्तेत नसल्याने त्यांना झोप लागत नाही. त्यामुळे आता शिवसेनेच्या भावना गवळी यांच्यावर कारवाई केली ती चुकीची आहे. जनता कधीही माफ करणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत भाजपचा चोख निर्णय होणार, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.
हेही वाचा - 'मंदिरं उघडा अन्यथा तांडव होईल', भाजपचं आज राज्यभर शंखनाद आंदोलन
राज्यात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील - राजेश टोपे
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लहान मुलांनादेखील आता कोणाची बाधा होत आहे. केंद्र सरकार नियम पाळा, असे सांगत असूनही भाजपने आज मंदिर सुरू करा, म्हणून आंदोलन केले. एकदा रुग्ण वाढले की भाजप पुन्हा महाविकास आघाडी सरकारच्या नावाने बोलतो. त्यामुळे हे भाजपचेच कारस्थान आहे, या शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली. राज्य सरकारच्या विरोधात सातत्याने काही तरी करत राहायचे हा भाजपचा प्रयत्न आहे. सत्तेसाठी कोणतीच यश मिळत नसल्याने आता परमेश्वराला हाक देत आहे, असा टोला त्यांनी लगावला.