ETV Bharat / state

केंद्र सरकारला साष्टांग नमस्कार घालतो, पण लोकांना तडफडायला लावू नका - हसन मुश्रीफ - कोल्हापूर कोरोना स्थिती

रेमडीसिवीर नसल्याने लोक तडफडून मरत आहेत. मी केंद्राला साष्टांग नमस्कार करतो, वाटलं तर भाजपच्या हातात औषधे द्या! पण लोकांना तडपडू देऊ नका, अशी विनंती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

author img

By

Published : Apr 27, 2021, 6:39 PM IST

कोल्हापूर - लोक लसीकरण केंद्रावर रांगा लावत आहेत. रेमडीसिवीर नसल्याने लोक तडफडून मरत आहेत. मी केंद्राला साष्टांग नमस्कार करतो, वाटलं तर भाजपच्या हातात औषधे द्या! पण लोकांना तडपडू देऊ नका, अशी विनंती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोना स्थितीबाबत बोलत होते.

खासदार सुजय विखे-पाटील यांनी हिमाचलमधून २ हजार रेमडीसिवीर औषध मात्रा आणल्या. केंद्र सरकारचे औषधांवर नियंत्रण असताना त्यांनी हे इंजेक्शन कसे मिळवले? वडिलांच्या हस्ते वाटप कसे केले? त्याची शुद्धता व भेसळता तपासली का? या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर २९ एप्रिलला सुनावणी असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

भाजपच्या नेत्यांना कसे काय औषधे मिळतात? असा सवाल करत हे समोर यायला पाहिजे. भाजपचा कोणीही नेता जातो आणि औषधो घेऊन येतो. त्यावर केंद्राचे नियोजन नाही का? की केवळ भाजपला इंजेक्शन देण्याचे केंद्राने ठरवले आहे, असे मुश्रीफ म्हणाले. त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे व्यथित झाले आहेत. ते केंद्र सरकारच्या पाया पडतो म्हणाले होते, असेही मुश्रीफ म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.