कोल्हापूर : त्यांनी कोणत्याही अविचाराने निर्णय घेतला तर, आपणही तसाच घेणं हे योग्य नाही. महाराष्ट्रात आमचे सरकार आहे. आम्ही कर्नाटकच्या नेत्यांना मुंबईत आणि राज्यात येण्यास बंदी करू शकतो मात्र, आम्ही असे करणार नाही. समोपचाराने प्रश्न सुटले पाहिजेत, अशी आमची इच्छा आहे. कर्नाटक कडून सीमा भागातील नागरिकांना कशाप्रकारे वागणूक दिली जाते, हे सर्वांना माहीत आहे, असे वक्तव्य (targeted Karnataka and other leaders) मंत्री दीपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) यांनी केले.
महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा : न्यायालयाचा निकाल हा आमच्याच बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास आहे. मात्र, कर्नाटक सरकार आजपर्यंत त्यांच्या लोकांना बहुभाषा सुविधा देखील देऊ शकले नाहीत. कर्नाटक मधील देवस्थानला जाणारे रस्ते सुद्धा तुम्ही नीट करू शकला नाहीत. तुमच्याकडे रस्ते दुरुस्त करायला पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करता, असे म्हणत केसरकर यांनी कर्नाटक सरकारला टोला लगावला. यावेळी सेनेवर टीका करताना केसरकर म्हणाले, तुम्ही गुन्हा केला म्हणून तुरुंगात गेला. शिंदे मात्र आंदोलनामुळे कर्नाटक तुरुंगात होते, असेही ते म्हणाले.
मला योग्य वाटत नाही : राज ठाकरे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याविषयी बोलणं मला योग्य वाटत नाही. पैशाने माणसं फुटत असती आणि विकत घेता येत असती, तर सर्व उद्योगपती नेते बनले असते. दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले, शिंदे यांच्या मागे लोक का गेली याचा सर्वांनी विचार करायला हवा. अधिवेशन काळात शिंदेंच्या घराकडून सर्व आमदारांना जेवणाचा डबा येत होता, असेही ते यावेळी म्हणाले.
ठाकरेंना हिंदुत्व मान्य नव्हते : तुम्ही आमदारांना कधी प्रेम देऊ शकला नाही. भेटू शकला नाही. तुम्हाला हिंदुत्व सुद्धा मान्य नव्हते, तुम्हाला सावरकरांचा झालेला अपमान मान्य आहे. मात्र बाळासाहेब असते तर त्यांना हे सर्व मान्य झाले नसते, म्हणून आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळाले. मागे राहिलेल्या लोकांनाही हे सत्य लवकरच समजेल. शिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे कटकारस्थान होते. त्याला उद्धव ठाकरे बळी पडले.