कोल्हापूर - आज कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बेळगावात असणारे पदाधिकारी कर्नाटक सरकारच्या बस मधून काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
त्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बेळगावात तळ ठोकून होते. 34 पेक्षा अधिक सदस्य सोबत असल्याचा दावा महाविकास आघाडीने केला आहे. त्यामुळे विजय जवळपास निश्चित असल्याचे चित्र दिसत आहे. बेळगावहून निघालेल्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी थोड्याच वेळात कोल्हापूरात शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार असून आघाडीकडून काँग्रेसच्या बजरंग पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.
हेही वाचा - कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवड, महाविकासआघाडीच्या नेत्यांची बेळगावमध्ये बैठक