ETV Bharat / state

कोल्हापूरात माथाडी कामगारांचा संप; कांदा -बटाटा मार्केटमध्ये शुकशुकाट

author img

By

Published : Dec 14, 2020, 11:31 AM IST

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध आणि आपल्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरात माथाडी कामगार संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले आहे.याचा परिणाम कोल्हापूरातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर झाला आहे. नेहमी वर्दळ असणाऱ्या या बाजार समितीत आज शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

Mathadi workers strike in Kolhapur
कोल्हापूरात माथाडी कामगारांचा संप

कोल्हापूर- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध आणि आपल्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरात माथाडी कामगार संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले आहे. याचा परिणाम कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील पहायला मिळत आहे. जवळपास साडेतीनशे माथाडी कामगारांनी या आंदोलनात सहभाग नोंदवल्यामुळे कांदा-बटाट्याचे व्यवहार ठप्प होऊन बाजार समितीत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

कोल्हापूरात माथाडी कामगारांचा संप

माथाडी कामगारांच्या मागण्या-

1. माथाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून कोरोनामुळे मृत झालेल्या कामगारंना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी.

2. माथाडी कामगारांना कामावर येण्या-जाण्यासाठी रेल्वेचे तिकिट द्यावे.

3. माथाडी कामगारांच्या कामात शिरकाव केलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यात यावा.

4. कांदा बटाटा, भाजी पाला, फळे फॉन्ड्रीवरीर नियमन कायम करणे.

5. बाजार आवारातील मालाची आवाक होऊन कामगारांना कामाचा पुरेसा मोबदला मिळावा.

6. कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांना प्राधान्य देण्यात यावे.

7. विविध माथाडी मंडळावर पूर्णवेळ चेअरमन, सेक्रेटरी यांची नेमणूक करणे. यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.

फळे-भाजी सौदे सुरू

माथाडी कामगारांचा आज संप असला, तरी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये फळभाजी सौदे सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी व्यापारी अडते आणि किरकोळ विक्रेत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

हेही वाचा- LIVE UPDATES : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; सभागृहात विरोधकांचा गोंधळ

हेही वाचा- मोठी बातमी..पहिल्या हिंदकेसरी मल्लाचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.