ETV Bharat / state

टाळेबंदी काळातील वीज बिले माफ करा; कोल्हापुरात भव्य वाहन मोर्चा

कोल्हापूरमध्ये आजपर्यंत निघालेल्या वाहन मोर्चामध्ये हा सर्वाधिक भव्य मोर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारला या मोर्चाच्या माध्यमातून शहाणपण यावे, असे आंदोलकांनी म्हटले असून लवकरात लवकर वीजबिल माफी संदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभरात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Jan 7, 2021, 3:36 PM IST

कोल्हापूर - कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी काळातील वीजबिले माफ करावीत, यासाठी कोल्हापुरात आज भव्य वाहन मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये 250 हुन अधिक रिक्षा, 200 हुन अधिक ट्रक आणि तितक्याच ट्रॅव्हल्ससुद्धा सहभागी झाल्या आहेत. कोल्हापूरमध्ये आजपर्यंत निघालेल्या वाहन मोर्चामध्ये हा सर्वाधिक भव्य मोर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारला या मोर्चाच्या माध्यमातून शहाणपण यावे, असे आंदोलकांनी म्हटले असून लवकरात लवकर वीजबिल माफी संदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभरात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला. 'आम्ही वीज बिल भरणार नाही कृती समिती'च्या वतीने हा भव्य मोर्चा काढण्यात आला. गांधी मैदानपासून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील विविध भागांतून हा मोर्चा निघाला.

कोल्हापूर

कोल्हापुरातील या तोफेचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर जाईल-
टाळेबंदी काळात सर्वांचे उद्योगधंदे बंद पडले, व्यवसाय बंद पडले, नोकऱ्या गेल्या असताना नागरिकांना वाढीव वीज बिले दिली गेली आणि ती वीज बिल वसुली सध्या सुरू आहे. एकीकडे शासनाने नागरिकांना दिलासा देण्याची गरज असताना वाढीव वीज बिले भरावी लागत आहेत. मात्र, आम्ही कोणत्याही परिस्थितीत वीज बिल भरणार नसून या काळातील सहा महिन्यांचे वीजबिल माफ झाले पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम असल्याचे आंदोलकांनी म्हटले.
दिवाळीला गोड बातमी देणार होते, मात्र दिली नाही -
वाढीव वीज बिलाचा मुद्दा जेव्हा समोर आला, त्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने पार पडली. याची दखल घेत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिवाळीला गोड बातमी देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र, आपल्या वक्तव्यावर घुमजाव करत आलेले वीजबिल भरावेच लागेल असे त्यांनी म्हटले. मात्र, महाराष्ट्रातील जनता खुळी नाही. शासनाने आजच्या या आंदोलनाची दखल घेऊन शहाणपणाने घेण्याची गरज आहे. अन्यथा कोल्हापुरातील या जनतेचा आवाज राज्यभरात पोहोचेल, असा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिला.
रॅलीमुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी -
'आम्ही वीज बिल भरणार नाही कृती समिती'च्या वतीने काढण्यात आलेला वाहन मोर्चा इतका भव्य होता, ज्यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. एकाच वेळी शहरात इतक्या मोठ्या संख्येने ट्रक, टेम्पो, ट्रॅव्हल्स रस्त्यावर आल्याने वाहतूक शाखेची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.