कोल्हापूर - पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एक जवान हुतात्मा झाला. करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील 33 वर्षीय संग्राम पाटील हा जवान सीमेवर लढताना हुतात्मा झाला. ही बातमी कळताच आमदार ऋतुराज पाटील यांनी निगवे खालसा या गावाला भेट देत अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणाची पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी ग्रामस्थांना केले. सोमवारी (२३ नोव्हेंबर) रोजी हुतात्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
कोल्हापूरचा हुतात्मा जवान संग्राम पाटीलवर सोमवारी अंत्यसंस्कार, ग्रामस्थांकडून तयारी सुरू
जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राने आज आणखी एक सुपुत्र गमावला. कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा येथील संग्राम शिवाजी पाटील यांना वीरमरण आलं आहे. त्यांच्यावर सोमवारी गावातील विद्यालयाच्या पटांगणावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ग्रामस्थांकडून अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली आहे.