ETV Bharat / state

ज्या हाताने राखी बांधली, त्याच हातावर आज भावाचे अंतिम दर्शन घेण्याची वेळ - Pakistan attack Rishikesh Jondhale death

आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील जवान ऋषिकेश जोंधळे हे काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झाले. मात्र, ज्या हाताने राखी बांधली, त्याच हातावर आपल्या भावाच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याची वेळ जोंधळे यांच्या बहिणीवर आली आहे. कल्याणी जोंधळे, असे बहिणीचे नाव आहे.

Martyr Rishikesh Jondhale
हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे
author img

By

Published : Nov 16, 2020, 12:38 AM IST

कोल्हापूर - आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील जवान ऋषिकेश जोंधळे हे काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झाले. मात्र, ज्या हाताने राखी बांधली, त्याच हातावर आपल्या भावाच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याची वेळ जोंधळे यांच्या बहिणीवर आली आहे. कल्याणी जोंधळे, असे बहिणीचे नाव असून आज सकाळी 10 वाजत जोंधळे यांच्यावर बहिरेवाडी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

लाडका भाऊ गेला

ऋषिकेश आणि कल्याणी या दोन्ही भावंडांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. जेव्हा ऋषिकेश सैन्य दलात भरती झाले, तेव्हा कल्याणी नेहमी, आम्हाला तुझा अभिमान आहे, असे म्हणायची. मात्र, भाऊबीजच्या दिवशीच तिच्यावर भावाच्या अंत्यदर्शनाची वेळ येईल, असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. ऋषिकेश यांच्या जाण्याने कल्याणी हिला मोठा धक्का बसला आहे.

भारतानेसुद्धा पाकला सडेतोड उत्तर द्यावे

ऋषिकेश हे दोन वर्षापूर्वी सैन्यामध्ये भरती झाले होते. त्यांची पहिलीच पोस्टिंग जम्मू-काश्मीर या ठिकाणी झाली. एकुलता एक असलेले ऋषिकेश यांना अवघ्या 20 व्या वर्षी वीरमरण आल्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर, पाकिस्तानला भारताने सडेतोड उत्तर देण्याची गरज असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. ज्या शाळेत ऋषिकेश जोंधळे शिकले, त्या शाळेच्या आवारातच आज सकाळी 10 च्या दरम्यान त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

हुतात्मा जोंधळे यांचे पार्थिव शरीर त्यांच्या घरी सकाळी ७ वाजता येईल. त्यानंतर सकाळी 7 ते 7:30 पर्यंत ग्रामस्थ व नातेवाईकांना त्यांचे अंत्यदर्शन करता येईल. सकाळी 7:30 ते 9 दरम्यान जोधळे यांची अंत्ययात्रा निघेला. नंतर सकाळी 9 वाजता भैरवनाथ हायस्कूल पटांगणात जोंधळे यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी दाखल होईल. या ठिकाणी सैन्यदल व जिल्हा पोलीस दलाकडून जोंधळे यांना मानवंदना देण्यात येऊन त्यानंतर अंत्यविधी होईल.

हसन मुश्रीफ यांनी जोंधळे यांच्या कुटुंबीयांचे केले होते सात्वन

ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आल्याचे समजताच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे जोंधळे यांच्या कुटुंबीयांचे सात्वन करण्यासाठी शनिवारी (१४ नोव्हेंबर) बहिरेवाडी येथे आले होते. यावेळी, हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. शिवाय बहिरेवाडी गावाचा आम्हा देशवासियांना सार्थ अभिमान आहे. कारण हे गाव म्हणजे वीर जवानांच्या रत्नांची खाणच आहे, असे प्रतिपादन मुश्रीफ यांनी केले होते. तसेच, हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने जोंधळे कुटुंबीयांसाठी तीन लाखाचे अर्थसहाय्यसुद्धा मुश्रीफ यांनी यावेळी जाहीर केले होते.

पाकिस्तानने उरी सेक्टरमध्ये केले होते शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानी लष्कराने शुक्रवार (१३ नोव्हेंबर) जम्मू काश्मिरातील उरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या ३ जवानांना वीरमरण आले होते. यातील २ जवान उरी सेक्टरमध्ये आणि एक जवान गुरेज सेक्टरमध्ये हुतात्मा झाला होता. भारताने देखील प्रत्युत्तर दाखल जोरदार गोळीबार केला. यात पाकिस्तानचे सात ते आठ जवान ठार झाले होते. तसेच, पाकिस्तानी बंकर, इंधन साठे, दहशतवादी तळही नष्ट झाल्याची माहिती लष्करातील सूत्रांनी दिली होती.

हेही वाचा - उद्यापासून कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर दर्शनासाठी खुले; पाहा काय आहे नियमावली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.