ETV Bharat / state

कोल्हापुरात अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, मराठा आंदोलक ताब्यात - अजित पवारांना काळे झेंडे दाखवले

उपमुख्यमंत्री अजित पवारांना आज कोल्हापुरात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान, मराठा समाजाच्या 2145 विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्तीपत्र द्या, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Jun 14, 2021, 7:07 PM IST

कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज (14 जून) कोल्हापूरचा दौरा केला. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यालयातच कोंडले. हा सगळा प्रकार सावित्रीबाई फुले परिसरातील जिजाऊ फाऊंडेशनच्या कार्यालयात घडला. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या दरवाजावर हातांनी बडवून पोलिसांना दरवाजा उघडण्यास भाग पाडले. यावेळी कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली. दरम्यान, रस्त्यावरती बसून कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

कोल्हापुरात अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

'मराठा समाजाच्या 2145 विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्तीपत्र द्या'

'उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर येताना मराठा समाजाच्या 2145 विद्यार्थ्यांचे नियुक्तीपत्र घेऊनच यावे, असे आवाहन केले होते. शिवाय, लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार होतो. मात्र, दडपशाही करून पोलिसांनी कालपासूनच आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या हातात जे आहे ते प्रथम त्यांनी करावे. 2145 विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र तत्काळ द्यावे', असे आंदोलक सचिन तोडकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, सचिन तोडकर यांच्या कार्यालयाबाहेरच पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.

हेही वाचा - काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नाना पटोले असतील का?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.