ETV Bharat / state

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवड, महाविकासआघाडीच्या नेत्यांची बेळगावमध्ये बैठक

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक आज होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीच्या नेत्यांची बेळगावमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली. शक्तीप्रदर्शन करत सर्व सदस्य कोल्हापूर जिल्हा परिषदेत पोहोचणार आहेत.

बेळगावात पार पडली महाविकासआघाडीची बैठक
बेळगावात पार पडली महाविकासआघाडीची बैठक
author img

By

Published : Jan 2, 2020, 12:34 AM IST

कोल्हापूर - जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक आज होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीच्या नेत्यांची बेळगावमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि अरुण दुधवडकर यांच्यासह जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेस शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. आज सकाळी शक्तीप्रदर्शन करत सर्व सदस्य कोल्हापूर जिल्हा परिषदेत पोहोचणार आहेत.

राज्यात नव्याने उदयाला आलेल्या सत्ता समिकरणाचा राज्यात पहिला फटका भाजपला कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये बसण्याची शक्यता आहे. या अध्यक्ष निवडीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची भूमिकासुद्धा महत्त्वपूर्ण आहे. काही वेळापूर्वी चंद्रकांत पाटील आणि आमदार डॉ. विनय कोरे यांच्यात बंद खोलीत एक तास चर्चा झाली. त्यामुळे सत्ता वाचविण्यासाठी चंद्रकांत पाटील सुद्धा जोरदार प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. आता भाजप जिल्हा परिषदेतील सत्ता राखणार? की महाराष्ट्रातील महाविकासघाडीचा पहिला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बेळगावात पार पडली महाविकासआघाडीची बैठक

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला कोल्हापूर जिल्ह्यात अभूतपूर्व यश मिळाले. याच जोरावर दोन्ही पक्षांनी जिल्ह्यात आपल्या संघटना मजबूत केल्या. याचा सर्वाधिक फायदा भाजपला जिल्हा परिषद निवडणुकीत झाला. कधीकाळी एखादा जिल्हा परिषद सदस्य असलेल्या भाजपला अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तब्बल 14 जागा मिळाल्या. काँग्रेसलासुद्धा या निवडणुकीत 14 जागा मिळाल्या असल्या तरी राष्ट्रवादी बरोबरच स्थानिक आघाड्यांना एकत्र घेण्यात काँग्रेस मागे पडली आणि इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला. अर्थात यात महत्वाचा वाटा होता तो चंद्रकांत पाटील यांचा.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच इतर स्थानिक आघाड्यांना बरोबर घेऊन भाजपने 34 चा आकडा गाठून आपलं बहुमत सिद्ध केले आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक अध्यक्ष बनल्या. काही दिवसांपूर्वीच पुढील अध्यक्षपदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. त्यानुसार राज्यातले समीकरण बदलले. त्या पद्धतीनेच कोल्हापुरातील जिल्हा परिषदेतसुद्धा हे समीकरण पाहायला मिळत आहे.

सध्याचे पक्षीय बलाबल -

भाजपा – 14
शिवसेना – 10
कॉग्रेस – 14
राष्ट्रवादी – 11
जनसुराज्य – 6
ताराराणी आघाडी – 3
चंदगड युवक आघाडी – 2
स्वाभीमानी – 2
आवाडे गट – 2
भुदरगड विकास आघाडी - 2
एकूण सदस्य - 67
मॅजिक फिगर - 35

Intro:*कोल्हापूर ब्रेकिंग*

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक उद्या

निवडणुकीची खलबतं बेळगाव शहरात

महाआघाडीच्या नेत्यांची बेळगाव मध्ये महत्वपूर्ण बैठक

मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि अरुण दुधवडकर यांच्यात बैठक

जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेस शिवसेनेचे आमदार बैठकीला उपस्थित

महाआघाडीचे सदस्य सध्या सहलीवर

उद्या शक्तीप्रदर्शन करत सर्व सदस्य कोल्हापूर जिल्हा परिषदेत पोहोचणार

भाजप जिल्हा परिषदेतील सत्ता राखणार ? की महाराष्ट्रातील महाघाडीचा पहिला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार ? याकडे सर्वांचे लक्ष

सद्याचे पक्षीय बलाबल

भाजपा – 14
शिवसेना – 10
कॉग्रेस – 14
राष्ट्रवादी – 11
जनसुराज्य – 6
ताराराणी आघाडी – 3
चंदगड युवक आघाडी – 2
स्वाभीमानी – 2
आवाडे गट – 2
भुदरगड विकास आघाडी - 2

एकूण सदस्य - 67
मॅजिक फिगर - 35Body:.Conclusion:.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.