ETV Bharat / state

Border Dispute : महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू, 72 तासांपासून होती बंंद

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या ( Border Dispute ) पार्श्वभूमीवर कन्नड संघटनांनी ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या ६ ट्रकवर दगडफेक केली होती. यामुळे खबरदारी म्हणून दोन्ही राज्यातील परिवहन बस सेवा अचानक बंद करण्यात आली. गेल्या तीन दिवसापासून ही बस सेवा बंद होती. दरम्यान 72 तासांनंतर कोल्हापूरातून कर्नाटकातील बेळगावसाठी पहिली बस रवाना झाली ( Maharashtra Karnataka ST service started ) आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 9, 2022, 5:07 PM IST

कोल्हापूर: गेल्या 72 तासाहून अधिक काळापासून महाराष्ट्र कर्नाटक बंद असलेली एसटी सेवा आज पुन्हा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमावाद प्रकरण चिघळला आहे. कर्नाटकातील बेळगाव येथे कन्नड रक्षक वेदिका संघटनेकडून ही आंदोलन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करत महाराष्ट्र पासिंगच्या गाड्यांची तोडफोड केली होती. यामुळे महाराष्ट्र कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये असलेली परिवहन बस सेवा ही तत्काळ बंद करण्यात आली होती. मात्र आज तीन दिवसानंतर कोल्हापूर बस स्थानकातून बेळगावसाठी पहिली बस रवाना ( Maharashtra Karnataka ST service started ) झाली.

गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेली महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू करण्यात आली.

बससेवा तीन दिवसांपासून बंद: सीमावाद चिघळलेला ( Border Dispute ) असतानाच कन्नड संघटनांनी ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या ६ ट्रकवर दगडफेक केली होती. हिरेबागवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे फडकवले. त्याशिवाय, महाराष्ट्राच्या ट्रकला शाईदेखील फासण्यात आली. यामुळे खबरदारी म्हणून दोन्ही राज्यातील परिवहन बस सेवा अचानक ही बंद करण्यात आली. गेल्या तीन दिवसापासून ही बस सेवा बंद होती.

पहिली बस रवाना: गेल्या दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र परिवहन विभागाकडून ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र बेळगावमध्ये तणावाचे वातावरण असल्याने काही तासातच ही सेवा पुन्हा ठप्प झाली. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असून याचा फायदा खाजगी वाहतुकदार घेत असून अव्वाच्या सव्वा दर घेत प्रवासी वाहतूक करत होते. यामुळे लवकरात लवकर परिवहन सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. त्यानुसार आज दुपारी पहिली गाडी बेळगावकडे रवाना झाली आहे.

कर्नाटकची बस महाराष्ट्रात : आज सकाळपासून कर्नाटकातून महाराष्ट्रात बस सेवा पुन्हा सुरु झाली आहे. सकाळी बेळगाववरून कर्नाटकची बस पुण्याकडे रवाना झाली आहे. मात्र ही बस बेळगावहून निघाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर शहरात न येता बायपासमार्गे पुढे सातारा आणि मग पुण्याकडे रवाना झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.