ETV Bharat / state

Maharashtra Karnataka Border Dispute : संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्यानं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 18 पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल - कर्नाटक सरकार

Maharashtra Karnataka Border Dispute : संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्यानं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 18 पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर बेळगावातील मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळं याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Maharashtra Karnataka Border Dispute
Maharashtra Karnataka Border Dispute
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 1:33 PM IST

कोल्हापूर Maharashtra Karnataka Border Dispute : बेळगावात पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही 1 नोव्हेंबरला निषेध फेरी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 18 पदाधिकाऱ्यांसह तब्बल दीड हजार मराठी भाषिकांवर मार्केट पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळं कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांची मुस्कटदाबी सुरू असल्याचं बोललं जातंय. बेळगावच्या या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटण्याची शक्यता वर्तवली जातेय.

मार्केट पोलिसांनी केले गुन्हे दाखल : बेळगाव, निपाणी, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगाव मधील मराठी भाषिकांचा लढा सुरू आहे. बेळगावसह सीमाभागातील 865 गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावी, या मागणीकडे केंद्राचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 1 नोव्हेंबरला कर्नाटक राज्य स्थापना दिवसानिमित्त कर्नाटकात मराठी भाषेतून काळा दिवस साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही काळादिना निमित्त काळे कपडे परिधान करत निषेध फेरी काढण्यात आली होती. या दिनासाठी व्यापक जनजागृतीही करण्यात आली होती. यामुळं या फेरीला व्यापक प्रतिसाद लाभला. धर्मवीर संभाजी मैदान येथून फेरीला सुरुवात झाली. त्यानंतर मराठा मंदिर येथे जाहीर सभा घेण्यात आली होती. या फेरीत हजारो लोक सहभागी झाले होते. मात्र, या फेरीत संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या व कर्नाटक सार्वभौमत्वाला धक्का पोहोचण्याचा प्रयत्न केला तसंच या फेरीला पोलिसांनी परवानगी नाकारली असताना ही ही रॅली काढण्यात आली असे आरोप करत मार्केट पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे 18 पदाधिकारी आणि तब्बल दीड हजार मराठी भाषिकांवर गुन्हा दाखल केलाय. आता या घटनेचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

"बेळगावात 1 नोव्हेंबर रोजी मराठी बांधवांवर कानडी सरकारनं संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या म्हणून गुन्हे दाखल केलेत. पंधराशे काय पंधरा हजार जरी गुन्हे दाखल झाले तरीही शिवसेना सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मागं खंबीरपणे उभी आहे, कानडी सरकारनं मराठी भाषिकांवर अत्याचार करणं थांबवावं. हा मुद्दा न्यायप्रविष्ठ असताना अशा पद्धतीनं गुन्हे दाखल करणे लोकशाही राष्ट्रात निषेधार्थ आहे." - विजय देवणे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख शिवसेना (ठाकरे गट)

मराठी भाषिकांसाठी कायम लढत राहणार : लोकशाही पद्धतीनं गेल्या 67 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लढ्याला बेळगाव जिल्ह्यासह सीमा भागातील नागरिकांनी आजपर्यंत पाठिंबा दर्शवलाय. 1 नोव्हेंबर रोजी सनदशीर मार्गानं निषेध रॅली काढण्यात आली होती. यात सहभागी झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कर्नाटक प्रशासनानं गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, या हुकूमशाहीला भीक न घालता मराठी भाषिकांसाठी कायम लढत राहणार असल्याचं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला प्रमुख रेणु काणेकर यांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. Maharashtra Karnataka Border Dispute : सीमावादावर 'महाराष्ट्र एकीकरण समिती'ला पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र; म्हणाले...
  2. MES Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 निकालात सीमावर्ती भागात एमईएस उधळणार गुलाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.