कोल्हापूर- राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी गोवा बनावटीचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत सुमारे २० लाख ९८ हजारांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे करण्यात आली.
सापळा लावून कारवाई-
राज्य उत्पादन शुल्काचे कोल्हापूर विभागाचे यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैद्य मद्याची वाहतूक करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. दरम्यान आजरा मार्गावर अवैद्य मद्याची तस्करी होणार असल्याची खबर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक व कोल्हापूर विभागाला मिळाली होती. त्यानुसार आजरा गावच्या हद्दीत आजरा एस. टी. स्टॅन्डसमोर रस्त्यावर सापळा लावण्यात आला होता. महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे अर्तगत छापा घालून अवैध मद्याची वाहतूक करीत असताना पथकाने वाहनावर छापा टाकला. यात गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळून आले. त्यावर कारवाई करत सर्व बाटल्या जप्त करण्यात आल्या असून एक आयशर कंपनीच्या सहाचाकी ट्रक (MH-09-BC-3837) जप्त केला.
ट्रकला विशेष प्रकारचा कप्पा-