ETV Bharat / state

..तर कोल्हापूरचा विकास झाला असता; महापालिका निवडणुकीत चंद्रकांत पाटील टार्गेट

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपूर्वीच भाजप नेत्यांवर टीका करायला सुरुवात केली आहे. कोल्हापुरात त्याची प्रचिती आली. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

महापालिका निवडणुकीत चंद्रकांत पाटील टार्गेट

author img

By

Published : Dec 16, 2020, 1:13 PM IST

Updated : Dec 16, 2020, 1:28 PM IST

कोल्हापूर- महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत एकत्र असली तरी आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहे. मात्र आतापासूनच तिन्ही पक्षांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. पाटील यांच्यावर तिन्ही पक्षांकडून आरोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे.

चेहरा मोहरा बदलला असता-

नुकताच विकास कामाचा शुभारंभ पार पडला यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या स्टेजवरून भाजपला आव्हान देण्यास सुरुवात केले आहे. चंद्रकांत पाटलांनी राजकारण बाजुला ठेवून शहरातील विकासकामात दहा टक्के जरी लक्ष दिले असते तर शहराचा चेहरा-मोहरा बदलला असता, असा टोला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी लगावला आहे.

..तर कोल्हापूरचा विकास झाला असता;
कोल्हापुरातील न्यू शाहुपूरी इथल्या बेकर गल्ली, भुविकास बँक ते वृषाली हॉटेल चौक परिसरातील रस्त्यांचे काम गेल्या 20 वर्षांपासून रखडले होते. माजी महापौर सुरमंजिरी लाटकर यांच्या पुढाकारातून या परिसरातील रस्त्यांच्या नुतनीकरणाचे काम मंजूर झाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, ऋतूराज पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

काँग्रेस-राष्ट्रवादीला संपवण्यातच धन्यता-

याप्रसंगी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी, भाजपच्या सत्ता असताना तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्याचा विकास करता येणं शक्य होते. मात्र त्यांनी शहराचा विकास न करता कॉंग्रेस–राष्ट्रवादीला कसे संपवले जाईल यातच धन्यता मानली. त्याचा परिणाम शहरातील अनेक विकास कामं रखडल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळं आगामी काळात शहराचा चांगल्या प्रकारे विकास करण्यासाठी महाविकास आघाडीला साथ देण्याचे आवाहन नामदार मुश्रीफ यांनी यावेळी केले.

तर डोक्यावर घेतले असतं-

कॉंग्रेसच्या सत्ताकाळात कोल्हापूरच्या विकासासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी आणण्यात आला. भाजपची सत्ता आल्यावर स्वतःकडं प्रमुख खाती असूनही तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी शहर विकासासाठी किती निधी आणला हा संशोधनाचा विषय आहे. त्यांनी शहराच्या विकासाठी 10 टक्के जरी लक्ष घातलं असतं तर कोल्हापुरकरांनी त्यांना डोक्यावर घेतले असते, असा टोला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी लगावला.

कोल्हापुरसाठी महत्वकांक्षी असणाऱ्या थेट पाईपलाईनच्या कामात भाजपने अनेकवेळा खोडा घातल्याने हा प्रकल्प वेळेत पूर्ण होवू शकला नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारमुळे योजनेतील सर्व अडथळे दूर झाल्याने येत्या दिवाळीत कोल्हापूरवासियांना थेट पाईपलाईनमधून पाणी मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, ऋतूराज पाटील यांनीही आपल्या भाषणातून शहर विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला माजी नगरसेवक राजू लाटकर, भुपाल शेटे, सचिन पाटील, संदीप कवाळे, राहूल चव्हाण, अशोक जाधव, सुरेखा शहा, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह माजी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.

Last Updated : Dec 16, 2020, 1:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.