कोल्हापूर स्वामी कृष्ण सरस्वती दत्त महाराजांचा shri krishna saraswati maharaj jayanti जन्म दिनांक ७ फेब्रुवारी, इ.स. १८३६ रोजी कोल्हापूर येथील नांदणी ग्रामी इथे झाला. अप्पा भटजी आणि अन्नपूर्णा जोशी यांना गाणगापूरचे स्वामी नृसिंह सरस्वती यांच्या कृपेने हे अपत्य झाले होते shri krishna saraswati maharaj kolhapur . कृष्ण सरस्वती दत्त महाराज हे अनेक वर्षे बोलत नव्हते. बालवयातच कुलदेव खंडोबाच्या आज्ञेने कृष्ण सरस्वती दत्त महाराज अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडे गेले होते. स्वामी समर्थांनी कृष्ण सरस्वती दत्त महाराजांना मी आणि तू एकच आहोत असा दृष्टांत दिला होता. काही दिवस झाल्यावर स्वामींनी कृष्ण सरस्वतींना कोल्हापूरला जाण्याची आज्ञा दिली होती. त्याचे नाव श्री गुरू कृष्ण ठेवले होते. स्वामींनी श्रावण वद्य दशमी दिनांक २० ऑगस्ट इ.स. १९०० रोजी पहाटे देह विसर्जन केला. त्यांच्या पार्थिवाला वैराग्यमठीत समाधी देण्यात आली. नंतर शिष्यमंडळींनी भजनासाठी दुसरी मठी निर्माण केली. तिचे स्थान जवळच गंगावेस येथे असून ती निजबोधमठी म्हणून ओळखिली जाते. वैराग्यमठीपासून हे ठिकाण चालत १० मिनिटांच्या अंतरावर आहे. स्वामींचे शिष्य व्यास यांनी या मठीनिर्माणासाठी पुढाकार घेतला, या कारणाने तिला व्यासमठी असेही म्हणतात.
सर्व आयुष्य कुंभार आळीत वास्तव्यास स्वामी कृष्ण सरस्वती महाराजांनी आपले सर्व आयुष्य कोल्हापूर येथील कुंभार आळीत घालावले. श्रीमती ताराबाई शिर्के यांच्या घरी वास्तव्यास ते होते. ती सर्व वेश्या आळी होती. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यापासून त्यांनी लोकांना मुक्त करण्याचे कार्य केले. येथील सर्व वस्ती स्वामीजींच्या वास्तव्याने पुण्य झाली होती. या वाड्याला स्वामीजींनी वैराग्यमठी हे नाव दिले होते. स्वामीजी अखंड बालभावात रहात असत. त्यामुळे बरेच लोक त्यांना एका वेडा म्हणूनच समजत होते. स्वामीजींनी भक्तांसाठी अनेक चमत्कार केले असे ग्रंथात सांगितले आहे. गाणगापूर व नरसोबाची वाडी येथे तप करणारया अनेक भक्तांना दत्तगुरूंनी स्वप्नदृष्टांत देउन करवीर येथे मी कुंभार स्वामी या नावानी अवतार घेतला असून तेथे जावे असे सांगितले होते. स्वामी कोल्हापूर सोडून कधीही बाहेर गेले नेही. पण कित्येक वेळी हाबेरचे लोक त्यांना भेटण्यासाठी आले होते. तसेच अक्कलकोट स्वामींनी देह ठेवल्यावर त्यांच्या काही भक्तांना स्वामींनी 'मी कुंभार स्वामी या नावाने कोल्हापूर येथे आहे' असे दृष्टान्त दिले होते. कृष्ण सरस्वती स्वामींनी त्यांना अक्कलकोट स्वामी स्वरूपात दर्शन दिल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
स्वामींचे शिष्य कृष्णा लाड, वासुदेव दळवी, रामभाऊ, रामभाऊ फारिक, म्हादबा, वेणीमाधव, व्यास, बाळकृष्ण राशीवडेकर, महादेव भट, नामदेव महाराज namdev maharaj , अनंत आळतेकर हे स्वामीजींच्या अंतरंग शिष्यांपैकी होते.. पूज्य नामदेव महाराजांचे शिष्य स्वर्गीय श्री नानासाहेब गद्रे , श्री नाना परांजपे , श्री ज्ञानेश्वर काटकर यांनीही स्वामिभक्तीच्या प्रसाराचे कार्य केले.
हेही वाचा मुंबईतील बोरिवलीत चार मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती