कोल्हापूर - शहरासह ग्रामीण भागालाही सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतमालाचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात, अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी, विजांच्या कडकडाटासह हजेरी लागली. गडहिंग्लज, नेसरी, आजरा आणि इचलकरंजी परिसरात मुसळधार पाऊस बरसला. यामुळे आंबा, काजू, कलिंगड पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
वादळी-वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब कोसळले. यामुळे विद्युतप्रवाह खंडीत करण्यात आला. तसेच वाऱ्यामुळे झाडे रस्त्यांवरच कोळमडून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान उकाड्याने हैरान झालेल्या कोल्हापूरकरांना मात्र, या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूरातील 56 जणांची तबलिगी जमात मेळाव्याला हजेरी, 26 जणांचे क्वारंटाईन
#SocialDistancing : पंतप्रधानांच्या आवाहनाला कोल्हापुरकरांचा चांगला प्रतिसाद !