ETV Bharat / state

कोल्हापूर पोलिसांना सापडले कोट्यवधींचे घबाड; पाच दरोडेखोरांना अटक - पत्रकार परिषदेत

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 2 कोटी 35 लाख 20 हजार 420 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि सोने दरोडेखोरांकडून जप्त करण्याची ही कोल्हापूर पोलिसांची आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.

दरोडेखोरांकडून जप्त केलेले घबाड
author img

By

Published : Jun 29, 2019, 6:10 PM IST

कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्याकडून 2 कोटी 35 लाख 20 हजार 420 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरोडा तपासासाठी गेलेल्या कोल्हापूर पोलिसांच्या हाती हे कोट्यवधी रुपयांचे घबाड लागले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि सोने दरोडेखोरांकडून जप्त करण्याची ही कोल्हापूर पोलिसांची आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहीती दिली

कोल्हापूर येथे राजेंद्र नगर परिसरात लक्ष्मी गोल्ड बुलियन नामक कंपनी आहे. या कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या रोख रकमेसह सोन्याच्या मुद्देमालावर दरोडा टाकल्याप्रकरणी पाच दरोडेखोरांना कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ‘लक्ष्मी गोल्ड बुलियन’ कार्यालयाजवळ एका कारच्या (केए 48 एन 0067) समोर दरोडेखोरांनी दुसरी कार आडवी लावली होती. त्यात दरोडेखोरांनी चिंतामणी पवार, सुशांत कदम, सागर सुतार यांचे अपहरण केले. व त्यांच्या कारमधील हवालाची रोकड व दागिने असा कोट्यवधी रुपयांचा किमती मुद्देमाल लुटला होता.

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, दोन कार एकामागून जाताना दिसून आल्या. शिवाजी पुलावरील सीसीटीव्ही फुटेजमध्येही त्या रत्नागिरीच्या दिशेने जाताना दिसून आल्या. पोलिसांनी तपास केला असता, संशयित लक्ष्मण पवार याने त्याचा मेव्हणा गुंडाप्पा नंदिवाले, अविनाश मोटे, अक्षय मोहिते, इंद्रजित देसाई यांच्यासह अन्य साथीदारांना हाताशी धरून लुटमार केली. तसेच स्वत:ची कार वापरली असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान अखेर 2 कोटी 35 लाख 20 हजार 420 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यामध्ये आणखी काही साथीदारांचा समावेश असल्याची शक्यता पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत वर्तविली आहे.

अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे खालीलप्रमाणे -
1) मुख्य सूत्रधार लक्ष्मण अंकुश पवार (वय 26, रा. खटके वस्ती, लिंगीवरे, ता. आटपाडी, जि. सांगली)
2) गुंडाप्पा तानाजी नंदीवाले (26, रा. तमदलगे, ता. हातकणंगले)
3) अविनाश बजरंग मोटे (26, रा. शिवाजी चौक, हातकणंगले)
4) अक्षय लक्ष्मण मोहिते (26, र. आंबेडकर नगर, हातकणंगले)
5) इंद्रजित बापु देसाई (24, रा. हातकणंगले)

Intro:अँकर- दरोडा तापासासाठी गेलेल्या कोल्हापूर पोलिसांच्या हाती कोट्यवधी रुपयांच घबाड लागलंय. कोल्हापूरातल्या राजेंद्र नगर परिसरातील लक्ष्मी गोल्ड बुलियन या कंपनीच्या कोट्यवधी रुपयांचा रोख रकमेसह सोन्याच्या मुद्देमालावर दरोडा टाकल्याप्रकरणी पाच दरोडेखोरांना कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आज अखेर 2 कोटी 35 लाख 20 हजार 420 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या रॅकेटमध्ये आणखी साथीदारांचा समावेश असून, पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि सोनं दरोडेखोरांकडून रिकव्हर करणे ही कोल्हापूर पोलिसांची आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.Body:व्हीओ- समोर दिसणारे 100, 500 आणि 2000 हजारांच्या नोटांचे बंडल खेळण्यातले नाहीत... तर हे बंडल अगदी खरेखुरे आहेत... राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजेंद्रनगर येथील एका हॉटेलपाठीमागे ‘लक्ष्मी गोल्ड बुलियन’ कार्यालयाजवळ कारच्या (के. ए. 48 एन. 0067) समोर दरोडेखोरांनी दुसरी कार आडवी लावून चिंतामणी पवार, सुशांत कदम, सागर सुतार यांचे अपहरण करून त्यांच्या कारमधील हवालाची रोकड, दागिने असा कोट्यवधी रुपयांचा किमती मुद्देमाल लुटला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, दोन कार एकामागून जाताना दिसून आल्या. शिवाजी पुलावरील सीसीटीव्ही फुटेजमध्येही त्या रत्नागिरीच्या दिशेने जाताना दिसून आल्या. पोलिसांनी तपास केला असता, संशयित लक्ष्मण पवार याने त्याचा मेव्हणा गुंडाप्पा नंदिवाले, अविनाश मोटे, अक्षय मोहिते, इंद्रजित देसाई यांच्यासह अन्य साथीदारांना हाताशी धरून लुटमार केली आहे; त्यासाठी स्वत:ची कार वापरली असल्याचे निष्पन्न झाले होते. यांच्या कडून तपासादरम्यान आज अखेर 2 कोटी 35 लाख 20 हजार 420 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

बाईट- अभिनव देशमुख (पोलीस अधीक्षक)

अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे खालीलप्रमाणे :
1)मुख्य सूत्रधार लक्ष्मण अंकुश पवार (वय 26, रा. खटके वस्ती, लिंगीवरे, ता. आटपाडी, जि. सांगली)
2)गुंडाप्पा तानाजी नंदीवाले (26, रा. तमदलगे, ता. हातकणंगले)
3)अविनाश बजरंग मोटे (26, रा. शिवाजी चौक, हातकणंगले)
4)अक्षय लक्ष्मण मोहिते (26, र. आंबेडकर नगर, हातकणंगले)
5)इंद्रजित बापु देसाई (24, रा. हातकणंगले)Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.