ETV Bharat / state

Kolhapur North by election : कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक जाहीर; 'या' दिवशी मतदान

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ( Kolhapur North by election ) जाहीर करण्यात आली आहे. येत्या 12 एप्रिल रोजी ही पोटनिवडणूक होणार असून 16 एप्रिल रोजी मतमोजणी असणार आहे.

author img

By

Published : Mar 12, 2022, 8:50 PM IST

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ( Kolhapur North by election ) जाहीर करण्यात आली आहे. येत्या 12 एप्रिल रोजी ही पोटनिवडणूक होणार असून 16 एप्रिल रोजी मतमोजणी असणार आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर या मतदारसंघात जागा रिक्त झाली होती. त्यामुळे पोटनिवडणूक कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, आज (दि. 12 मार्च) निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

  • असे असेल निवडणूकीचे स्वरूप
  1. अर्ज दाखल करण्याची तारीख - 17 मार्च, 2022
  2. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - 24 मार्च, 2022
  3. अर्जांची छाननी - 25 मार्च, 2022
  4. अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख : 28 मार्च, 2022
  5. मतदान तारीख : 12 एप्रिल, 2022
  6. मतमोजणी तारीख : 16 एप्रिल, 2022

अनेकजण इच्छूक - आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्याच पत्नी जयश्री जाधव यांना बिनविरोध निवडून द्यावे हीच चंद्रकांत जाधव यांना श्रद्धांजली असेल, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही म्हंटले होते. मात्र, शिवसेना तसेच भाजपकडून असे वक्तव्य अद्याप आले नसून पक्षाकडून जो आदेश येईल त्यानुसार निर्णय घेणार असल्याचे येथील इच्छूक उमेदवारांनी म्हटले आहे. याठिकाणी शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर तसेच संजय पवार इच्छुक आहेत. तसेच भाजपकडून महेश जाधवही इच्छुक आहेत. तसेच सत्यजित उर्फ नाना कदमही इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे नेमके काय होणार हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा - Rupali Chakankar criticism on Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांनी अंतिम तारीख जाहिर करावी - रुपाली चाकणकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.