कोल्हापूर - जिल्ह्यात भूस्खलनच्या घटनेत वाढ होताना पाहायला मिळत आहे. गगनबावडा तालुक्यातील अंदुर धुंदवडे रस्ता खचला आहे. तर शेळोशी केवढे आणि गुरव वाडी या ठिकाणी ही दरडी कोसळल्याच्या काही घटना घडल्या आहेत. तर शाहूवाडी तालुक्यातील करंजफेन गावात दरड कोसळल्याने संपूर्ण पेट्रोल पंप मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला आहे. तसेच या परिसरात दरड कोसळल्याच्या अन्य घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे हजारो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. तर शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडावरील जमीन देखील खचायला सुरुवात झाली आहे. विशाळगडावरील जमीन जवळपास सात ते आठ फूट खचली असून विशाळगडाला धोका निर्माण झाला आहे.
Kolhapur Landslide Live Update: करंजफेणमध्ये पेट्रोल पंप ढिगाऱ्याखाली, विशाळगडावरील जमीन खचली - विशाळगडाला धोका
![Kolhapur Landslide Live Update: करंजफेणमध्ये पेट्रोल पंप ढिगाऱ्याखाली, विशाळगडावरील जमीन खचली Kolhapur Landslide Live Update](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12565331-81-12565331-1627184364220.jpg?imwidth=3840)
08:57 July 25
Kolhapur Landslide Live Update: करंजफेणमध्ये पेट्रोल पंप ढिगाऱ्याखाली, विशाळगडावर जमीन खचण्यास सुरुवात