ETV Bharat / state

Exclusive : जेवणही मिळणार ईएमआयवर; कोल्हापुरातील हॉटेल व्यावसायिकाची भन्नाट कल्पना

कोरोनाच्या संकटामुळे अनेकांकडे पैसे नाहीत. तर हॉटेल उद्योगही बिकट स्थितीत आहे. त्यामुळे जेवण ईएमआयवर देण्याची कल्पना सुचल्याचे म्हावरा हॉटेलचे मालक गणेश माने यांनी सांगितले.

author img

By

Published : May 26, 2020, 8:34 PM IST

Updated : May 26, 2020, 11:01 PM IST

म्हावरा हॉटेल
म्हावरा हॉटेल

कोल्हापूर - बाजारात अनेक गोष्टी मासिक हप्त्यावर (ईएमआय) उपलब्ध आहेत. मात्र, कोल्हापुरातील एका हॉटेल व्यावसायिकाने चक्क जेवणच ईएमआयवर सुरू केले आहे. 'म्हावरा' असे या हॉटेलचे नाव आहे.

कोरोनाच्या संकटामुळे अनेकांकडे पैसे नाहीत. तर हॉटेल उद्योगही बिकट स्थितीत आहे. त्यामुळे जेवण ईएमआयवर देण्याची कल्पना सुचल्याचे म्हावरा हॉटेलचे मालक गणेश माने यांनी सांगितले. जेवण ईएमआयवर मिळणार म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे ईएमआयवर जेवण कसे घ्यायचे , याची माहिती गणेश माने यांनी दिली. ते म्हणाले, की ईएमआयवर जेवण घेणारा व्यक्ती कोल्हापूरचा रहिवासी असला पाहिजे. जेवण घेऊन जाताना त्याने पुढील तारखेचा चेक देणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे किमान २ हजारांहून अधिक किमतीचे जेवण घेणाऱ्यांसाठी ईएमआयची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोल्हापुरातील हॉटेल व्यावसायिकाची भन्नाट कल्पना

हेही वाचा-वडिलांच्या आठवणीने रितेश देशमुख झाला भावुक... शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडिओ

ग्राहकांना एकूण बिलाच्या ६५ टक्के, १५ टक्के व २० टक्के अशा तीन हप्त्यात पैसे देता येणार आहेत. त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आणखी हप्ते वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हॉटेल व्यवसायात १८ वर्षे असल्याचे माने सांगतात. हा कौटुंबिक व्यवसाय असल्याने त्यांना घरातील व्यक्ती मदत करतात. सगळीकडे टाळेबंदीमुळे विविध क्षेत्रातील उद्योग अडचणीत आहेत. सध्या, अनेकांकडे पैसे नाहीत. पण त्यांच्याकडे पैसे येणार आहेत. ही स्थिती लक्षात घेवून ईएमआय योजना माने यांनी सुरू केली आहे. ईएमआयवर जेवण ही संकल्पना अनेक ग्राहकांना आवडल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी 'एसटी' करणार मालवाहतूक, शेतकऱ्यांना आवाहन

कोल्हापुरातील जिल्हा परिषद रोडवर नागा पार्क येथे हे म्हावरा हॉटेल आहे. मासे खायची इच्छा झाली की माने यांचे म्हावारा हे हॉटेल अनेकांच्या डोळ्यासमोर येते. त्यांनी जेवणावर ईएमआयचीसुद्धा सुविधा उपलब्ध करून दिल्याने अनेकांना पर्वणीच ठरली आहे. खरेतर अशा प्रकारची भन्नाट कल्पना कुठेही पाहायला मिळाली नाही. पण आता कोल्हापूरकरांना मात्र या सुविधेचा लाभ घ्यायला मिळणार आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हॉटेल व्यावसायिकांना ग्राहकांना केवळ पार्सल देण्याची सोय केली आहे.

हेही वाचा-संघर्ष जगण्यासाठीचा... दिव्यांग वृद्ध कामगाराचा आंध्र ते उत्तर प्रदेश तीनचाकी सायकलवर प्रवास

Last Updated : May 26, 2020, 11:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.