कोल्हापूर - सध्या कोल्हापुरातील पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा पुराचे प्रमाणामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरले होते. जवळपास तीन ते चार फूट इतके पाणी जिल्हाधिकारी परिसरासह जिल्हाधिकारी कार्यालयात होते.
पुराच्या तडाख्यात येथील साहित्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, सध्या याठिकाणी स्वच्छतेचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई ज्या केबिनमध्ये बसतात, त्या केबिनमध्ये सुद्धा चिखलाचा थर लागला होता. त्यामुळे त्यावर पाण्याचा फवारा मारत संपूर्ण कार्यालयाची आता स्वच्छता करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती दिली आहे, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...