ETV Bharat / state

Kolhapur Flood: पूर पाहायला गेलेला तरुण नदीच्या पुरात रात्रभर अडकला, बचाव पथकाने 'अशी' केली सुटका - Kolhapur rain update

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांनी पूररेषा गाठली आहे. जिल्ह्यातील वारणा नदी पात्रात पन्हाळा तालुक्यातील काखे गावाजवळ एक तरुण गुरुवारी रात्रीपासून झाडावर अडकला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफच्या जवानांनी या तरुणाला आज सुखरूप बाहेर काढले आहे.

Kolhapur Flood
नदीच्या पुरात अडकलेल्या तरुणाची सुटका
author img

By

Published : Jul 28, 2023, 1:04 PM IST

नदीच्या पुरात अडकलेल्या तरुणाची सुटका

कोल्हापूर : सध्या राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे विविध ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. वारणा नदीच्या पुरात एक तरुण झाडावर अडकल्याची माहिती समोर येताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफचे पथक तात्काळ या ठिकाणी दाखल झाले. या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले आहे. हा तरुण झाडापर्यंत कसा पोहोचला, हे मात्र समजू शकले नाही. मात्र, अडकलेला तरुण हा टेलर काम करत असल्याचे गावकरी सांगत आहेत. वारणा नदीच्या पुरात झाडावर तरुण अडकला असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. पन्हाळा तालुक्यातील काखे, वारणा कडोली या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी नदीवर अडकलेल्या तरुणाला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

रात्रभर तरुण झाडावर : रात्री अकरा वाजता वारणा पात्रामध्ये बजरंग खामकर (राहणार- लादेवाडी, तालुका- शिराळा) हा तरूण अडकला होता. तो सकाळी जोरजोराने ओरडू लागल्यानंतर स्थानिक नागरिकांना तरुण पुरात अडकल्याचे कळाले. त्यानंतर त्यांनी नऊ वाजता पोलीस पाटील काखे यांना फोनवरून माहिती दिली. तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, एनडीआरएफचे पथक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन केले.

रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी : काखे गावच्या पोलीस पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफचे जवान आपल्या साधनसामग्रीसह वारणा नदी पात्रात पोहोचले. त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून या तरुणाचा जीव वाचवला. झाडावर अडकून पडलेल्या तरुणाला पाहण्यासाठी मात्र मोठी गर्दी झाली होती. नदीचा पूर पाहण्यासाठी आलेलो असताना पाय घसरून नदीत पडलो, असे बजरंग खामकर यानी सांगितले.

हेही वाचा :

  1. Thane Rain Update: पुराच्या पाण्यात अडकलेल्या 'त्या' नागरिकांची बचाव पथकाने केली सुटका; शेकडो कुटूंबाचे स्थलांतर
  2. Nanded Rain Update: नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, दोन तरुण गेले वाहून... काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
  3. Maharashtra monsoon Rain : मुंबई, ठाण्यात पावसाचा दिवसभर मुक्काम, आजही राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, जाणून घ्या कुठे आहे रेड अलर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.