ETV Bharat / state

Kolhapur Rain Update : पंचगंगेची पाणीपातळी 34 फुटांवर; कोल्हापूर जिल्हा हाय अलर्टवर - पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडेल

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे (Kolhapur Rain Update). पुढील काही दिवस अशाप्रकारेच जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे पाणी पातळीत होत असलेली वाढ पाहता उद्या दुपारपर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडेल, (Panchganga river will cross the warning level)अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Kolhapu
कोल्हापूर
author img

By

Published : Jul 12, 2022, 3:13 PM IST

Updated : Jul 12, 2022, 3:34 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून 15 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा पाणीपातळीत वाढ होत आहे. आत्तापर्यंत 47 बंधारे पाण्याखाली गेले असून असाच पाऊस सुरू राहिल्यास पंचगंगा नदी उद्या सकाळपर्यंत इशारा पातळी गाठेल (Panchganga river will cross the warning level) अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रकल्पांमधील पाणीसाठा -

धरण सध्याचे पाणी एकूण क्षमता
राधानगरी धरण4.49 टीएमसी53.69 टक्के
तुळशी1.81 टिएमसी52.12 टक्के
वारणा 18.19 टिएमसी52.89 टक्के
दुधगंगा11.22 टिएमसी52.89 टक्के
कासारी1.69 टिएमसी60.90 टक्के
कडवी1.69 टिएमसी52.12 टक्के
कुंभी प्रकल्प 1.51 टिएमसी55.69 टक्के
पाटगाव प्रकल्प2.00 टिएमसी53.71 टक्के
चिकोत्रा प्रकल्प0.82 टिएमसी53.60 टक्के
चित्री प्रकल्प0.87 टिएमसी46.33 टक्के
जंगमहट्टी प्रकल्प0.67 टिएमसी55.13 टक्के
घटप्रभा प्रकल्प1.56 टिएमसी100 टक्के
जांभरे प्रकल्प0.82 टिएमसी100 टक्के
कोदे प्रकल्प0.21 टिएमसी100 टक्के
आंबेओहोळ 0.81 टिएमसी100 टक्के

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन - दोन आठवडे जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सद्यस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी वर्षा सहलीला, ट्रेकिंगला जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. सद्यस्थितीत भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील धबधबे व अन्य वर्षा पर्यटन स्थळांच्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. याच कालावधीत जिल्ह्यातील बऱ्याच संघटना पन्हाळा ते पावनखिंड -विशाळगड अशा मार्गावर जंगल सफर आणि ट्रेकिंगच्या मोहिमा आयोजित करत आहेत. अशा स्वरुपाच्या मोहिमा, ट्रेकिंग मध्ये सहभाग घेत असताना अतिवृष्टीमुळे या मार्गावर दरड कोसळणे किंवा पूरस्थिती निर्माण होणे अशा स्वरूपाच्या घटना घडू शकतात. यामुळे अतिवृष्टी कालावधीत अशा स्वरूपाच्या मोहिमा आयोजित करू नयेत आणि यामध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी सध्याची पाणीपातळी :

बंधारापाणीपातळी इशारा/ धोका पातळी
राजाराम बंधारा34 फूट 39 फुट / 43 फुट
राजापूर बंधारा30 फुट53 फुट / 58 फुट
नृसिंहवाडी30 फुट53 फुट / 58 फुट
शिरोळ47 फुट65 फुट / 68 फुट
इचलकरंजी59 फुट68 फुट/ 71 फुट
तेरवाड 52 फुट 71 फुट / 73 फुट

हेही वाचा : पंचगंगा इशारा पातळीकडे, 15 तासांपासून पाणीपातळीत 6 इंच वाढ

हेही वाचा : Heavy Rain In Kolhapur : कोल्हापुरात मुसळधार पाऊस! एका दिवसात 6 बंधारे पाण्याखाली; पंचगंगा पाणीपातळी 17.5 फुटांवर

हेही वाचा : Panchaganga River Kolhapur : पंचगंगा इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता; इशारा मिळताच सुरक्षितस्थळी जा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Last Updated : Jul 12, 2022, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.