ETV Bharat / state

कोल्हापुरात 'इतके' डोस दाखल; शनिवारी लसीकरणाला सुरुवात

author img

By

Published : Jan 13, 2021, 9:03 PM IST

शनिवारी 16 जानेवारी रोजी कोल्हापुरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्यांना लस दिली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पोलीस, पालिका कर्मचारी, सफाई कामगार आदींना लस दिली जाणार आहे. त्याची तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर - ज्या गोष्टीची सर्वाधिक प्रतीक्षा होती ती कोरोना प्रतिबंधात्मक लस अखेर कोल्हापुरात दाखल झाली आहे. जिल्ह्यासाठी एकूण 37 हजार 580 लसीच्या मात्रा आज प्राप्त झाल्या आहेत. येत्या शनिवारी 16 जानेवारी रोजी कोल्हापुरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्यांना लस दिली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पोलीस, पालिका कर्मचारी, सफाई कामगार आदींना लस दिली जाणार आहे. त्याची तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे. महापालिका क्षेत्रात 6 आणि जिल्ह्यातील 8 केंद्रांवर याचा प्रारंभ शनिवारी होणार आहे.

लसीकरणाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक -

कोविड-19 लसीकरणाच्या नियोजन मोहिमेचा येत्या शनिवारी शुभारंभ होणार आहे. या अनुषंगाने मोहिमेचे नियोजन आणि एकूणच पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी कोविड लसीकरण मोहीम जिल्हा कृतीदल समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी सर्वच तयारीबाबत सुद्धा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आढावा घेतला. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक आदी उपस्थित होते.

14 केंद्रांवर प्रत्येकी 100 जणांना लसीकरण -

या लसीकरण मोहिमेसाठी सामाजिक संस्था, वैद्यकीय संघटना, खासगी डॉक्टर्स या सर्वांचा सहभाग घेण्यात यावा, अशा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सूचना दिल्या आहेत. शिवाय शनिवारी सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी सर्व लोकप्रतिनिधींसह धर्मगुरूंनाही नजिकच्या केंद्रांवर शुभारंभ प्रसंगी निमंत्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रात 6 आणि जिल्ह्यातील 8 केंद्रांवर अशा एकूण 14 केंद्रांवर प्रत्येक केंद्रांवर 100 लाभार्थींप्रमाणे लसीकरण करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांच्या समन्वयातून लसीकरण मोहीम यशस्वी करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.