कोल्हापूर - जिल्ह्यात आज (मंगळवारी) पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 378वर आली आहे. आज दिवसभरात 22 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 37 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 49 हजार 82 रुग्णांपैकी 47 हजार 20 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 1684 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील आजपर्यंतची तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या
- आजरा- 862
- भुदरगड- 1227
- चंदगड- 1212
- गडहिंग्लज- 1465
- गगनबावडा- 146
- हातकणंगले- 5283
- कागल- 1663
- करवीर- 5625
- पन्हाळा- 1856
- राधानगरी- 1236
- शाहूवाडी- 1352
- शिरोळ- 2500
- नगरपरिषद क्षेत्र- 7422
- कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14924
- इतर जिल्हा व राज्यातील 2309 असे मिळून आत्तापर्यंत एकूण 49 हजार 82 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा - राज्यातील सर्व जागांवर भाजपचा विजय होईल - चंद्रकांत पाटील
जिल्ह्यातील एकूण 49 हजार 82 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 47 हजार 020 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 1684 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 378 इतकी आहे.
वयोगटानुसार एकूण रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
- 1 वर्षांपेक्षा लहान - 56 रुग्ण
- 1 ते 10 वर्ष - 1866 रुग्ण
- 11 ते 20 वर्ष - 3442 रुग्ण
- 21 ते 50 वर्ष - 26113 रुग्ण
- 51 ते 70 वर्ष - 14055 रुग्ण
- 71 वर्षांपेक्षा जास्त - 3550 रुग्ण