ETV Bharat / state

कोरोना लसीकरणाबाबत कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम, आणखी २२० लसीकरण केंद्र सुरू करणार - जिल्हाधिकारी

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या आवाक्यात असले तरी, जिल्हा प्रशासनाने ५०० बेडची व्यवस्था केली आहे. तर लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जिल्ह्यात आणखीन २२० लसीकरण केंद्र १ एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहेत.

Kolhapur Collector said 220 new vaccination centers will be started on April 1
कोल्हापूर जिल्ह्यात आणखी नवे २२० लसीकरण केंद्र आणि ५०० बेडची तयारी
author img

By

Published : Apr 1, 2021, 2:53 AM IST

Updated : Apr 1, 2021, 3:15 AM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या आवाक्यात असले तरी, जिल्हा प्रशासनाने ५०० बेडची व्यवस्था केली आहे. तर लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जिल्ह्यात आणखीन २२० लसीकरण केंद्र १ एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहेत. ३५० लसीकरण केंद्राच्या माध्यमातून महिनाभरात संपूर्ण लसीकरण पूर्ण केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

जिल्हाधिकारी दौलत देसाई माहिती देताना
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत तीन लाखापेक्षा अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात कोल्हापूर जिल्हा लसीकरणाबाबत प्रथम स्थानी आहे. दरम्यान कोरोना रुग्णांचा वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन अथक प्रयत्न करत आहेत. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना लस प्रतिबंधक केंद्रांची संख्या १५० इतकी होती. तर १ एप्रिल पासून २२० आणखीन नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. एप्रिल पासून ४५ वरील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. जिल्ह्यात सध्या ६ लाख ३७ हजार २२७ इतके ४५ वयावरील तर, ५ लाख ९ हजार ८१९ नागरिक ६० वर्षावरील असे एकूण ११ लाख ४७ हजार ४६ हजार नागरिक लसीकरणासाठी लाभार्थी आहेत. ३१ मार्च अखेर ३ लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.
उर्वरित ९ लाख नागरिकांना पुढील महिनाभरात लस देण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात आणखीन २२० लसीकरण केंद्र १ एप्रिल पासून सुरू करणार असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी मोबाईल व इंटरनेट साठी नेटवर्क चांगले असेल अशा दुर्गम भागात देखील लस पोहचवण्यासाठी प्रयत्न असतील असे देसाई यांनी सांगितले.

५०० बेडची व्यवस्था
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असताना पुन्हा एकदा वाढत असताना दिसत आहे. आतापर्यंत ५० हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या ३५ वर येऊन पोहचली होती. मात्र ३१ मार्च रोजी कोरोना उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ७७३ इतकी आहे. वाढती रुग्णाची संख्या विचारात घेता जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ५०० बेड रुग्णांच्या उपचारासाठी तयार केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

Last Updated : Apr 1, 2021, 3:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.