ETV Bharat / state

कोल्हापुरात चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला कारने उडवले; भयानक घटना सीसीटीव्हीत कैद - kolhapur breaking news

कोल्हापूरमध्ये धैर्यप्रसाद चौक ते सदर बाजार या दरम्यान रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकीला समोरून आलेल्या कारने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील व्यक्ती लांब उडून पडली. तर कारही रस्ताच्या दुसऱ्या बाजूला जाऊन धडकली. यामध्ये दुचाकीवरील वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.

kolhapur car and bike accident one died
कोल्हापुरात भीषण अपघात, विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला कारने उडवले
author img

By

Published : Jul 11, 2020, 5:21 PM IST

कोल्हापूर - धैर्यप्रसाद चौक ते सदर बाजार या दरम्यान रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकीला समोरून आलेल्या कारने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील व्यक्ती लांब उडून पडली. तर कारही रस्ताच्या दुसऱ्या बाजूला जाऊन धडकली. यामध्ये दुचाकीवरील वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.

कोल्हापुरात भीषण अपघात, विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला कारने उडवले

हेही वाचा - रेमडीसिवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक; मीरारोड पोलिसांची कारवाई

सकाळी सात वाजण्याच्या सुमारास धैर्यप्रसाद कार्यालय ते सदर बाजार रोडवर हा थरारक अपघात घडला. या अपघाताची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. आज (शनिवार) सकाळी पुरुषोत्तम बालिगा हे दुचाकीवरून सदर बाजार परिसराकडे जात होते. चुकीच्या मार्गिकेने जात, रस्ता ओलांडत असताना समोरून आलेल्या भरघाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की, दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. तर अपघातात दुचाकीवरील पुरुषोत्तम बालिगा या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.

तसेच या अपघातात अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून दुचाकीला धकड दिल्यानंतर कार सुद्धा उलटल्याचे त्यात दिसत आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून या भीषण अपघाताची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.