ETV Bharat / state

कळंबा कारागृह गांजा-मोबाईल प्रकरण : दोषींवर कठोर कारवाई केली जाईल - अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद - कळंबा कारागृह गांजा-मोबाईल प्रकरण

कारागृहात फेकलेल्या 10 मोबाईल आणि गांज्याच्या पाठीमागे नेमका कोणाचा हात होता शिवाय हे कोणासाठी आतमध्ये फेकले गेले, याचा पोलीस तपास करत आहेत. लवकरच दोषी सापडतील आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी म्हटले आहे.

अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद
माहिती देताना अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद
author img

By

Published : Dec 25, 2020, 6:47 PM IST

कोल्हापूर - कळंबा कारागृहात फेकलेल्या 10 मोबाईल आणि गांज्याच्या पाठीमागे नेमका कोणाचा हात होता शिवाय हे कोणासाठी आतमध्ये फेकले गेले याचा पोलीस तपास करत आहेत. लवकरच दोषी सापडतील आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी म्हटले आहे. शिवाय राज्यातील सर्वच कारागृहांमध्ये नवीन सीसीटीव्ही बसविण्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे पाठविला असल्याचे सांगितले. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गांजा आणि मोबाईल प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस महासंचालक रामानंद यांनी कोल्हापुरातील कळंबा कारागृहाला भेट देऊन पाहणी केली. शिवाय घटनेची संपूर्ण माहिती घेऊन उपायोजनांबाबत संबंधितांना सूचना दिल्या.

माहिती देताना अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद
काय आहे प्रकरण?
कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये 22 डिसेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी कारागृहाच्या भिंतीवरून तीन कापडी गठ्ठे कारागृहात फेकले होते. हे येथील सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्याची तपासणी केली असता त्यामध्ये पाऊण किलो गांजा, 10 मोबाईल, 2 पेन ड्राईव्ह, 5 मोबाईलचे चार्जर असे साहित्य आढळून आले. ज्यांनी हे साहित्य कारागृहात फेकले त्यांचा तपास सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस घेत असून यामध्ये कारागृहातील कोणी व्यक्ती सहभागी होती का? याबाबत सुद्धा चौकशी सुरू करण्यात आली आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच याचा तपास पूर्ण होऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आज कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कारागृह अधीक्षक शेळकेंची बदली; चंद्रमणी नवे अधीक्षक -
घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेत कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची तडकाफडकी पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये बदली करण्यात आली आहे. शेळके यांच्या जागी येरवडा कारागृहातील उपअधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गांजा आणि मोबाईलप्रकरणी कारागृहाचे उप महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या अधिपत्याखाली विभागीय चौकशी नेमून या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल असेही कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी सांगितले. शिवाय कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यामार्फत या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात येईल असेही ते म्हणाले.

कारागृहातील बंदीजनांची सुनावणी कारागृहातूनच व्हीसीद्वारे व्हावी यासाठी कायद्यात बदल सूचवला -

कारागृहातील बंदीजणांना न्यायालयीन कामकाजासाठी ने-आण करताना कारागृह प्रशासनाबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांना अपुऱ्या मनुष्यबळामुळे कसरत करावी लागते. त्यामुळे राज्यातील सर्वच कारागृहांमधील बंदी जणांची सुनावणी कारागृहामधून नियमितपणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात यावी, याबाबत मी कायद्यात बदल करावा, अशी सूचना सरकारला सूचवली आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून याबाबत गृहमंत्र्यांशी सुद्धा बोललो असल्याचे रामानंद यांनी म्हटले. हे शक्य झाल्यास सुनावण्या खूप जलद गतीने होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले असून त्याचा पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.