ETV Bharat / state

गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू - भीषण अपघात

Kolhapur Bus Accident : गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसचा कोल्हापूर जवळ असणाऱ्या पुई खडी या परिसरात अपघात झाल. यात तिघांचा मृत्यू झालाय.

Kolhapur Bus Accident
Kolhapur Bus Accident
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 8:55 AM IST

Updated : Nov 23, 2023, 9:50 AM IST

खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

कोल्हापूर Kolhapur Bus Accident : गोव्याहून मुंबईला जाणारी एक खासगी ट्रॅव्हल्स गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास कोल्हापूर शहराजवळ राधानगरी मार्गावर पुईखडी इथं उलटून भीषण अपघात झालाय. या अपघातात पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तिघांचा झोपेत असताना मृत्यू झालाय. नीलू गौतम (43), रिद्धिमा गौतम (17) आणि सार्थक गौतम (13) अशी मृतांची नावे आहेत.

पणजीहून मुंबईला जात होती बस : याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातील पणजी इथनू मुंबईला जाणारी खाजगी स्लीपर कोच बस बुधवारी रात्री आठ वाजता निघाली. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास कोल्हापूर शहराजवळ पुईखडी इथं ही भरधाव बस उलटली. या अपघाताची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आणि करवीर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी तातडीनं बचाव कार्य राबवून जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये पाठवलं. या अपघातात बसखाली अडकल्यामुळं एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झालाय. या बसमध्ये 25 प्रवाशी होते अशी माहिती अग्नीशामक दलाच्या जवानांनी दिलीय. तसंच या अपघातात 4 प्रवासी बसच्या खाली अडकले आहेत. या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलीय.

दिल्लीतही अपघातात बाप लेकाचा मृत्यू : दिल्लीच्या पश्चिम जिल्ह्यातील राजौरी गार्डन परिसरात मंगळवारी रात्री उशिरा अति वेगानं दोघांचे जीव घेतले. एक कुटुंब उद्ध्वस्त केलं. स्कूटरवरून जात असलेल्या पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांना भरधाव कारनं पाठीमागून धडक दिली. यात पिता आणि मुलाचा मृत्यू झाला. तर आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून कार चालकाचा शोध घेत आहेत. याआधी आठवडाभरात दिल्ली पोलिसांचा एक जवान रस्ता अपघातात जखमी झाला होता. दुसरीकडं टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर कारस्वाराच्या भांडणात दोन तरुणांवर गोळीबार झाला होता.

हेही वाचा :

  1. ऑटोरिक्षा आणि ट्रक यांच्यात भीषण धडक, आठ शाळकरी मुलं जखमी; पाहा घटनेचा थरारक Video
  2. विशाखापट्टणम बंदरात अग्नितांडव; 40 बोटी जळून खाक, पाहा व्हिडिओ
  3. जिल्हाधिकाऱ्याच्या वाहनानं चिरडल्यानं तीन जणांचा जागीच मृत्यू, अपघातानंतर आयएएस अधिकाऱ्यानं काढला पळ?

Last Updated : Nov 23, 2023, 9:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.