ETV Bharat / state

एसीबीची दोन ठिकाणी कारवाई: सीपीआरमधील वाहनचालकासह हुपरीचा तलाठी जाळ्यात - ACB Dy SP Adinath Budhwant

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दोन आरोपींना रंगेहात पकडल्याची माहिती दिली. वाहनचालक बट्टेवार 25 हजार रुपये स्वीकारल्याने रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रंगेहात पकडण्यात आलेले आरोपी
रंगेहात पकडण्यात आलेले आरोपी
author img

By

Published : Jun 19, 2020, 8:32 PM IST

कोल्हापूर - प्रथम कंत्राटी पध्दतीवर व त्यानंतर कायमस्वरुपी कामावर आदेश काढून देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सीपीआरमधील वाहनचालक राहूल प्रल्हाद बट्टेवार याला लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. विंधन विहिरीची सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या हुपरी येथील तलाठी कल्लाप्पा देवाप्पा शेरखानेलाही एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दोन आरोपींना रंगेहात पकडल्याची माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सीपीआरमध्ये रुग्ण सहाय्यकांची (वॉर्ड बॉय) प्रथम कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरती होणार आहे. काही दिवसानंतर त्यांना कायमस्वरुपी कामावर हजर करुन घेणार असल्याचे संशयित आरोपी बट्टेवार याने तक्रारदाराला सांगितले होते. भावाला व त्याला स्वत:ला वॉर्डबॉय म्हणून कामावर हजर करुन घेण्याची विनंती तक्रारदाराने संशयित आरोपीकडे केली. बट्टेवार याने तक्रारदार आणि त्याच्या भावाला वॉर्ड बॉय म्हणून कंत्राटी पध्दतीने कामावर हजर करुन घेण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी रितसर अर्ज स्वत: भरतो असे सांगून दोघांच्या आधारकार्डची झेरॉक्स व छायाचित्रे घेवून येण्यास सांगितले. वरिष्ठांना सांगून कायमस्वरुपी पुन्हा कामावर घेण्याचा आदेश मुंबई येथील आरोग्य विभागामधून काढून देण्यासाठी 5 लाख रुपये द्यावे लागतील, असेही आरोपीने सांगितले. अन्यथा, कायमस्वरुपी नोकरीचा आदेश देणार नाही, असे बट्टेवार याने तक्रारदाराला सांगितले.

यानंतर लाचेच्या मागणीची तक्रार तक्रारदाराने 17 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. याच दिवशी पंच साक्षीदारांच्या समक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये 5 लाख रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने तक्रारदारकडून 5 लाखांची मागणी करून पहिला हप्ता 25 हजार रुपयांचा स्वीकारण्याचे मान्य केले. उर्वरित रक्कम एकरकमी देण्यास सांगितले. त्यानुसार लावलेल्या सापळ्यात वाहनचालक बट्टेवार याला 25 हजार रुपये स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

-लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

हुपरी येथे 2 हजाराची लाच घेताना तलाठी जाळ्यात अडकला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराने मे महिन्यामध्ये हुपरी गावातील शेतामध्ये विहीर इंधन घेतले आहे. याची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी आरोपी तलाठी कल्लाप्पा देवाप्पा शेरखाने याच्याकडे 16 जून रोजी अर्ज दिला होता. त्यावर लाचेची मागणली झाली असता तक्रारदारने तलाठी शेरखाने यांच्याविरुध्द तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार हुपरी तलाठी कार्यालयामध्ये शासकीय पंच साक्षीदाराच्या समक्ष लाच मागणीची पडताळणी केली. पडताळणीमध्ये शेरखाने याने तडजोडीअंती 2 हजार रुपयाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. एसबीने लावलेल्या सापळ्यात 2 हजार रक्कम स्वीकारताना तलाठी शेरखाने रंगेहात सापडला. अशा वेगवेगळ्या ठिकाणी दोन कारवाई करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.