कोल्हापूर - केंद्रात भाजपचे सरकार येईल आणि मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, असा विश्वास संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी आज कोल्हापुरात मतदान केले. त्यावेळी ते बोलत होते.मतदानानंतर संभाजीराजेंनी युवकांनी उस्फुर्तपणे मतदान करायला हवे, उन्ह आहे म्हणून त्यांनी मतदान करण्यास टाळाटाळ करू नये, असे आवाहनही यावेळी केले आहे.
कोल्हापुरात युतीचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपचे समर्थन केले. तसेच भाजपच्या समर्थनामुळे विरोधकामधून होणाऱ्या टीकेलाही त्यांनी सडेतोड उत्तर दिले. भाजपने मला सन्मानाने दिल्लीला बोलावून घेतले आहे. त्यांनी मला राजकारणात सक्रीय सहभागी न होण्याचीही मुभा दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.