कोल्हापूर : बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमध्ये कार्य करत असलेले सामाजिक कार्यकर्ते अधिक कदम हे आज कोल्हापूरात तेथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांच्या तसेच पालनपोषण करत असलेल्या एकूण 45 अनाथ मुलींना घेऊन कोल्हापूर पर्यटनाला आले आहेत. कोल्हापूरात कशा पद्धतीने एकोप्याने सर्वजण राहतात. कोणत्याही धर्माच्या भिंती इथे पाहायला मिळत नाहीत यासह विविध माहिती ते या सर्व मुलींना या दौऱ्यातून देत आहेत. विशेष म्हणजे या सर्व मुलींची त्यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्याशी भेट घालून दिली. यावेळी महाराजांनी सुद्धा या चिमुकल्या काश्मिरी अनाथ मुलींना राजवाड्यात पाहुणचार केला.
यासाठी ते कोल्हापूर दौऱ्यावर : जम्मू-काश्मीर येथे गेल्या काही वर्षांपासून बोर्डरलेस वर्ल्ड फौंडेशन संस्थेच्या माध्यमातून मोठे काम सुरू आहे. तेथील विविध प्रश्न सोडविण्याचे सुदधा काम केले जात आहे. आज याच बोर्डरलेस वर्ल्ड फौंडेशन संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते अधिक कदम हे आज कोल्हापूरात तेथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या एकूण 45 अनाथ मुलींना घेऊन कोल्हापूर पर्यटनाला आले आहेत. त्यांच्या या बोर्डरलेस वर्ल्ड फौंडेशन संस्थेच्या माध्यमातून अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांच्या मुलांचे पालनपोषण करत आहेत. त्यातीलच पालनपोषण करत असलेल्या एकूण 45 अनाथ मुलींना ते आज कोल्हापूर मधील सर्वधर्म ऐक्याचे वातावरण दाखवण्यासाठी तसेच येथील शेती, सहकार बद्दल माहिती देण्यासाठी सोबत घेऊन आले आहेत. यावेळी त्यांच्या विनंतीवरून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी सुद्धा तात्काळ सर्वच चिमुखल्या मुलींना नवीन राजवड्यावर निमंत्रण दिले. तसेच सर्वांसोबत चहापान सुद्धा केले.
मुलांशी संवाद आणि काश्मीर मधील परिस्थिती बाबत चर्चा : दरम्यान, यावेळी आदिक कदम यांनी काश्मीर मध्ये बोर्डरलेस वर्ल्ड फौंडेशन संस्थेच्या माध्यमातून कोणकोणती कामे सुरू आहेत त्याची माहिती दिली. शिवाय जम्मू काश्मीर मध्ये सद्यस्थितीत काय परिस्थिती आहे याचीही माहिती दिली. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी काश्मीर मधील या अनाथ मुलींशी संवाद साधला त्यांच्याकडून सुद्धा तिथल्या परिस्थितीबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी राजवाड्यात आपल्याला पाहुणचार मिळाल्यानंतर प्रत्येक मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.