ETV Bharat / state

Sharad Pawar on BJP : पैशाचा आणि बळाचा वापर करून राजकारण करणाऱ्यांना बाजूला ठेवायची वेळ आली - शरद पवार

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. पैशाचा आणि बळाचा वापर करून राजकारण करणाऱ्यांना आता बाजूला करण्याची वेळ आली आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

sharad pawar criticizes bjp
शरद पवार
author img

By

Published : May 8, 2023, 8:06 PM IST

जाहीर सभेला बोलताना शरद पवार

बेळगाव: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यासाठी निपाणी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार हे आज कर्नाटक दौऱ्यावर गेले होते, यावेळी त्यांनी जाहीर सभेत भाजपवर जोरदार टीका केली आहे.

भाजपवर केली जोरदार टीका: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस देखील उतरले आहे. निपाणी विधानसभा मतदारसंघातून उत्तम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज निपाणीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करताना देशात आज वेगळे चित्र निर्माण झाला आहे. आज सकाळीच बातमी पाहिली की, मणिपूरमध्ये दंगल निर्माण झाले आहे. याबद्दल चार दिवसात 54 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मनिपुरमध्ये भाजपचे राज्य असून केंद्रात देखील भाजपचे राज्य आहे. भाजपने आपल्या हातातील असलेली सत्तेचा वापर करून मणिपूर कसा वाचवता येईल यासाठी पराकाष्टा केली पाहिजे. मात्र भाजप काही करताना दिसत नाही, अशा शब्दात त्यांनी जोरदार टीका केली आहे.

पैशाचा आणि बळाचा वापर : देशात अनेक ठिकाणी भाजप निवडून आले नव्हते. महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरेंचे सरकार होते, मात्र महाराष्ट्रात पैशाचा आणि बळाचा वापर करून पक्ष फोडून सरकार बनवल तर मध्य प्रदेश देखील कमलनाथ यांच सरकार होते. तेथे देखील आपल सरकार बनवले अशा अनेक ठिकाणी बळाचा आणि पैशाचा वापर करून सरकार बनवण्याच काम भाजप करत आहे. त्याला कर्नाटक सुद्धा अपवाद नाही. पैशाचा आणि बळाचा वापर करून राजकारण करणाऱ्यांना आता बाजूला ठेवायची वेळ आली आहे, असे म्हणत शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

देशात होणारी बदनामी चांगली नाही: कर्नाटक सारख्या राज्याची 40 टक्केच राज्य म्हणून देशात होणारी बदनामी चांगली नाही. मिळालेली सत्ता ही सामान्य माणसासाठी वापरायचे असते. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना वीरेंद्र पाटील हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. वीरेंद्र पाटील हे स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री आम्हाला पाहायला मिळाले. मात्र आज कर्नाटक 40 टक्केच सरकार म्हणून पूर्ण देशात बदनाम झाला आहे.असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांना निवडून आणा. येथील विकासाची जबाबदारी माझी असेल असे म्हणत, मतदारांना शरद पवार यांनी विश्वास दिला.

भाजपने फौजदारचा हवालदार केला : काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे. ते येथे काय करणार ते पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या. त्याचे काय करायचे ते मी पाहतो असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसची खिल्ली उडवली होती. दरम्यान आज निपाणी येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रतिउत्तर दिले. साडेतीन जिल्ह्याचा पक्ष म्हणणाऱ्याला भाजपने फौजदारचा हवालदार केला आहे. आता हा आमची माप काढत आहे. त्याला स्वतःचे स्थान टिकवता आले नाही असे म्हणत, जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आमचे चांगले चाललेले सरकार फोडण्याचे पाप त्यांनी केले. आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल त्यांना वाटत होते मात्र दिल्लीने दुसऱ्यालाच मुख्यमंत्री पद दिले, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली.

हेही वाचा:

Sharad Pawar Mind Gamer भाजपाविरोधकांची एकजूट बनवणाऱ्या शरद पवारांच्या मनात आहे तरी काय अनेकवेळा बदलला डाव

Sharad Pawar News ठाकरे गटाकडून शरद पवारांच्या राजकीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित

Abdul Sattar on Sanjay Raut त्या महाकुत्र्याला राज्यसभेवर आम्हीच पाठवलं अब्दुल सत्तारांची जीभ घसरली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.