ETV Bharat / state

Kolhapur News: सेंद्रिय गुळाचा कारभारी गोडवा! कारभारवाडीची आदर्शवाडीकडे वाटचाल

author img

By

Published : Feb 11, 2023, 7:34 AM IST

महिलांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहभागाने गावाच्या शाश्वत विकासासाठी कोल्हापूरातल्या करवीर तालुक्यातील कारभारवाडी गेल्या काही वसर्षांपासून प्रयत्न करत आहे. गटशेती अंतर्गत एक नवा आदर्श या गावाने संपूर्ण राज्यसमोर निर्माण केला आहे. भविष्यात हीच कारभारवाडी राज्यात आदर्शवाडी बनण्याकडे वाटचाल करत आहे.

karbharwadi
शाश्वत विकासाचे स्वयंपूर्ण खेडे होणार कारभारवाडी

कोल्हापूर: विशेष म्हणजे गावात निर्माण केलेल्या सेंद्रिय गुळाच्या कारभारी गोडवा ब्रँडला सुद्धा आता संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा गावाला भेट दिली आहे.

कारभारवाडीतील प्रकल्प सुरू: कारभारवाडी गावामध्ये ठिबक सिंचनाने शेतीला पाणीपुरवठा, आंतरपिके, गांडूळ खत निर्मिती, ग्रीन हाऊस, सिंचन सुविधा, आधुनिक आरोग्यदायी गुळ प्रक्रिया युनिट, कृषीमाल प्रक्रिया मशिनरी आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. तर महिला बचत गटाच्या माध्यमातून हळद, जिरे, धने पावडर, आकाशकंदील बनवणे, विविध प्रकारच्या चटण्या, खाद्यतेल, मसाले, शेवया, पापड तयार करुन बाजारात आणण्याची तयारी सुरु आहे. दरम्यान, या सर्व उद्योगांच्या माध्यमातून कारभारवाडीमध्ये स्वयंपूर्ण खेडे संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे गटाचे अध्यक्ष प्रा. डॉ. नेताजी पाटील यांनी सांगितले.

उद्योगधंद्यांसाठी कर्जपुरवठ्याची गरज : गावात विविध प्रकल्प सुरू आहेत. त्यामध्ये इथली सिंचन व्यवस्था, आधुनिक आरोग्यदायी गुळ प्रक्रिया युनिट ज्यामध्ये रसायन विरहित गुळ निर्मिती केली जाते. महिलांकडून चटणी मशीन, शेवया मशीन, विविध मसाले तयार करणाऱ्या कृषी माल प्रक्रिया मशीनरी आदी छोटे छोटे उद्योग सुद्धा सुरू आहेत. गावात आजपर्यंत लाखोंची उलाढाल केली आहे. भविष्यात याच सर्व महिलांना अजूनही काही उद्योगधंद्यांसाठी शासनाकडून कर्जपुरवठा होण्याबाबत पाठपुरावा होण्याची गरज असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. प्रशासनाकडून सुद्धा याबाबत सकारात्मक प्रतिसाद असलयाचे गावकऱ्यांनी म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाशिवाय, कृषी, पणन विभागासह शासनाच्या सर्व विभागांनी गावच्या विकासासाठी सहकार्य केल्याचे ग्रामस्थ आवर्जून सांगतात.

जिल्हाधिकाऱ्यांची गावाला भेट: करवीर तालुक्यातील कारभारवाडीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी भेट देवून गटशेती अंतर्गत कै. शिवा रामा पाटील कृषी शेतकरी स्वयंसहाय्यता गट अंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी केली. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी येथील विद्यार्थिनी, महिला व ग्रामस्थांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती देवून लाभ घेण्याचे आवाहन केले. शिवाय यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून कारभारवाडीची वाटचाल विकासाच्या दिशेने होत आहे याचे कौतुक केले. गावकऱ्यांनी नाविन्याचा ध्यास घेवून नवनवीन उपक्रम राबवून गावच्या शाश्वत विकासावर भर द्यावा. यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. येथील विविध प्रकल्प महिलांच्या पुढाकाराने होत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. कुक्कुटपालन सारख्या उद्योग निर्मितीलाही चालना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले होते.

हेही वाचा: Shiv Era Martial Act कोल्हापूरात एकेकाळी व्हायच्या फरी गदकाच्या भव्य स्पर्धा पाहूया काय होता हा खेळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.