ETV Bharat / state

चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम उधळून लावू; कन्नड रक्षण वेदिकेचा इशारा - maharashtra karnataka boundary dispute

बेळगाव आणि सीमाभागात महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा चिघळला आहे. कन्नड संघटनांचा बेळगावमध्ये धिंगाणा सुरू असून कन्नड रक्षण वेदिका संघटनेने आंदोलन सुरू केले आहे.

kolhapur
कन्नड रक्षण वेदिकेचा इशारा
author img

By

Published : Dec 29, 2019, 9:33 AM IST

Updated : Dec 29, 2019, 10:28 AM IST

कोल्हापूर - बेळगाव आणि सीमाभागात महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. कन्नड संघटनांचा बेळगावमध्ये धिंगाणा सुरू असून कन्नड रक्षण वेदिका संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा, इशाराही कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

कन्नड रक्षण वेदिका कार्यकर्ता

भाषावार प्रांतरचनेवेळी कर्नाटकात अडकलेल्या सीमाभागातील मराठी भाषिक आणि हा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असे वादग्रस्त विधान कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केले होते.

मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचाराचा संदर्भ देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल केला होता. यानंतर एका कन्नड संघटनेच्या नेत्याने मराठी भाषिकांना थेट गोळ्या घालून हत्या करण्याची भाषा केली आहे. यामुळे सीमाभागात याचे संतप्त पडसाद उमटले असून या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे.

हेही वाचा - महाराष्ट्र एकीकरण समितीमधल्या एकाच्याही केसाला धक्का लागला तर गाठ सेनेशी - धैर्यशील माने

चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचा रविवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि समस्त बेळगावकर सीमावासियांच्या वतीने जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला आहे. हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम अनगोळ येथील आदर्श मल्टिपर्पज सोसायटी सभागृहात दुपारी 3.00 वाजता पार पडणार आहे. मात्र, सध्याची परिस्थीतीने सीमाभागातील वातावरण चिघळले असून आमदार पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम आम्ही उधळून लावू, असा इशारा कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

हेही वाचा - पालिका आयुक्तांनी बोलविलेल्या बैठकीत कृती समिती आणि अधिकारी यांच्यातच वाद

Intro:*बेळगाव ब्रेकिंग*

चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम उधळून लावू- कन्नड रक्षण वेदिकेचा इशारा

राजेश पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम होऊ देणार नाही

आम्ही कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते हा कार्यक्रम बंद पाडू त्यांना

राजेश पाटील यांना बेळगाव मध्ये पाय ठेवू देणार नाही

राजेश पाटील यांचा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत आणि समस्त बेळगावकर सीमावासीयांच्या वतीने जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला आहे

दुपारी 3.00 वाजता अनगोळ येथील आदर्श मल्टिपर्पज सोसायटी सभागृहात हा सत्कार समारंभ पार पडणार आहे...

हाच कार्यक्रम होऊ न देण्याचा कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दिला इशाराBody:.Conclusion:.
Last Updated : Dec 29, 2019, 10:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.