ETV Bharat / state

केंद्रीय व राज्य पुरातत्व विभागाकडून महालक्ष्मी मंदिराची पाहणी - Inspection of Mahalakshmi Temple

केंद्रीय व राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी करवीर निवसिनी श्री महालक्ष्मी मंदिराची पाहणी केली. त्यावेळी मंदिरावरील जो कोबा आहे, तो मंदिराचाच एक भाग बनला आहे. तो काढण्यापेक्षा तो त्या ठिकाणी असलेला चांगली वाटेल, असे मत केंद्रीय पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा आणि व्यक्त केले.

केंद्रीय व राज्य पुरातत्व विभागाकडून महालक्ष्मी मंदिराची पाहणी

author img

By

Published : Jan 19, 2021, 7:20 AM IST

Updated : Jan 19, 2021, 7:49 AM IST

कोल्हापूर - केंद्रीय व राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी करवीर निवसिनी श्री महालक्ष्मी मंदिराची पाहणी केली. त्यावेळी मंदिरावरील जो कोबा आहे, तो मंदिराचाच एक भाग बनला आहे. तो काढण्यापेक्षा तो त्या ठिकाणी असलेला चांगली वाटेल, असे मत केंद्रीय पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा आणि व्यक्त केले. मात्र या सर्व गोष्टींची पाहणी करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी म्हणाले.

मूर्तीची स्थिती सुस्थितीत
या पथकाने श्री अंबाबाई मूर्तीची पाहणी केली. तसेच महासरस्वती, महाकाली या मूर्तीची देखील पाहणी केली. यावेळी अंबाबाईची मूर्ती 2017 पेक्षाही अधिक सुस्थितीत आहे. केवळ पायाजवळ केमिकल कोटिंग करावे लागेल. मात्र मूर्ती सुस्थितीत असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

महालक्ष्मी मंदिराची पाहणी
रचनात्मक तपासणीचा अहवाल तपासून लेखी सूचना देवू- विलास वाहणेमुख्य मूर्ती मणिकर्णिका कुंड आणि मंदिरात वरील कोबा याची पाहणी केली. त्याबाबत स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट तपासून योग्य त्या लेखी सूचना मंदिर प्रशासनाला दिल्या जातील. असे मत राज्य पुरातत्त्व विभागाचे असिस्टंट डायरेक्टर विलास वाहने यांनी व्यक्त केले. मंदिरावरील कोब्याची पाहणी आज पुरातत्व विभागाच्या पथकाने केली. मात्र स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट तपासून त्यावर लेखी सूचना देण्यात येणार आहेत. हा कोबा काढत असताना मंदिराला धोका पोहोचणार का? या सर्व गोष्टी तपासूनच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुरातत्व विभागाकडून त्याबाबत एनओसी देण्यात येईल, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

आज पुरातत्व विभागाची पाहणी
दरम्यान, आज केंद्रीय पथकातील डेप्युटी सुप्रीटेंडीग श्रीकांत मिश्रा, सिनियर मॉडेलर सुधीर वाघ, राज्य पुरातत्व विभागाकडून विलास वाहणे यांनी पाहणी केली. अंबाबाई मंदिरातील मुख्य गाभारा, मातृलिंग परिसर, तसेच मंदिराच्या छतावरील भागाची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजी जाधव, सचिव विजय पोवार, व्यवस्थापक धनाजी जाधव, प्रभारी उपअभियंता सुयश पाटील, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, मिलिंद घेवारे उपस्थित होते.

मंदिरावर हजारोटनांचा बोजा
गेल्या अनेक वर्षांपासून अंबाबाई मंदिरावर वेळोवेळी गळती बंद करण्यासाठी छतावर टाकण्यात आलेल्या कोब्याची उंची आता 5 फुटांपर्यंत पोहोचली आहे. जवळपास 100 ट्रक माती इतके हे वजन असून मंदिराला मोठा धोका निर्माण झाला आहे. लवकरात-लवकर हे अनावश्यक वजन काढण्याची गरज असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली होती. अंबाबाई मंदिरावर जवळपास हजार टन वजनाचा कोबा असल्याची बाब समोर आली आहे. वेळोवेळी गळती बंद करण्यासाठी केलेल्या कोब्याची उंची आता 5 फूट झाल्याची माहिती आहे. अंबाबाई मंदिराच्या रचनात्मक तपासणीमधून (स्ट्रक्चरल ऑडिट) धक्कादायक बाब समोर आली आहे.

अन्यथा मंदिरासाठी हे धोकादायक
तपासणीतून मिळालेल्या माहितीनुसार वेळोवेळी मंदिरातील गळती रोखण्यासाठी टाकण्यात आलेल्या कोब्याची उंची 5 फुटांपर्यंत झाली आहे. त्याचे वजन हजार टन इतके असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून हे मंदिरासाठी अतिशय धोकादायक ठरणार आहे. मंदिर गेल्या कित्येक वर्षांपासून इतक्या मोठ्या प्रमाणात ओझे सोसत आहे. वारंवार गळतीमुळे शेवटी रचनात्मक तपासणी करण्यात आली, त्यात ही बाब समोर आली. मंदिरासाठी हे ओझे धोकादायक ठरणार असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले. त्यामुळे लवकरच तपासणी पूर्ण झाल्यानंतर ते काढण्याबाबत सर्व परवानग्या घेऊन त्याचे काम सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले होते.

हेही वाचा - ग्रामपंचायत निकाल जाहीर; निकालानंतर सर्वच पक्षांचा विजयाचा दावा

Last Updated : Jan 19, 2021, 7:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.