ETV Bharat / state

Indian Student Return To India : युक्रेनमधून जीव बचावून आलेल्या कोल्हापूरी कन्येनं सांगितली थरारक परिस्थिती - कोल्हापूर आर्या चव्हाण घरवापसी बातमी

भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमधील ( Indian Student In Ukraine ) विविध भागात अडकून पडले आहेत. यामध्ये कोल्हापूर ( Kolhapur Student Return To India From Ukraine ) जिल्ह्यातील देखील विद्यार्थी होते. कोल्हापूर शहरात राहणारी आर्या चव्हाण ( Arya Chavan Return To India ) ही मुलगी एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमधील चनविक्सी शहरात होती.

Indian Student In Ukraine
Indian Student In Ukraine
author img

By

Published : Feb 28, 2022, 4:08 PM IST

Updated : Feb 28, 2022, 7:23 PM IST

कोल्हापूर - भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमधील ( Indian Student In Ukraine ) विविध भागात अडकून पडले आहेत. त्यांना भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत असून कालच युक्रेनमध्ये अडकलेले काही विद्यार्थी भारतात दाखल झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर ( Kolhapur Student Return To India From Ukraine ) जिल्ह्यातील देखील विद्यार्थी होते. कोल्हापूर शहरात राहणारी आर्या चव्हाण ( Arya Chavan Return To India ) ही मुलगी एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमधील चनविक्सी शहरात होती. मात्र, जेव्हा रशियाकडून युक्रेनवर हल्ला करण्यात आला, तेव्हा सर्वत्र भीतीचे वातावरण झाले होते आणि विमानतळदेखील बंद झाले होते, असे तिने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया

काय म्हणाली आर्या -

भारतीय दूतावासने युक्रेनमधील सर्व भारतीय विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना सुरक्षित ठेवले आहे. तसेच आणखी काही विद्यार्थी तेथे अडकून आहेत. अनेक जणांना युक्रेनच्या सीमा ओलांडन्यात अडचणी येत असल्याने सरकारने लवकरात लवकर पावले उचलून सर्वांना भारतात परत घेऊन यावे, असे आवाहन तिने केले आहे.

मुलगी दिसताच आई झाली भाऊक -

भारतात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि एडमिशन मिळत नसल्याने आणि युक्रेनमध्ये खर्च कमी असल्याने नाईलाजास्तव युक्रेनला पाठवण्याची वेळ आली. मात्र, युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात आर्या अडकली होती. यामुळे आर्याचे आई-वडील हे चिंतेत होते. मात्र, जेव्हा आर्या विमानतळावर दाखल झाली, तेव्हा आई आणि परिवार भाऊक झाले होते. मात्र, आर्या सारखे अनेक विद्यार्थी अद्यापदेखील तेथे अडकलेले आहेत आणि दिवसेंदिवस परिस्थिती खराब होत असल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी सरकारणे अजून प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Indian Students in Ukraine : बेलगोरोड मार्गाने विद्यार्थ्यांना बाहेर काढावे, पवार-जयशंकर यांच्यात चर्चा, मोदी चार केंद्रिय मंत्री युक्रेन शेजारील देशात पाठवणार

Last Updated : Feb 28, 2022, 7:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.