ETV Bharat / state

भाजपच्या उमेदवाराचा पराभव करणाऱ्या प्रकाश आवाडेंचा भाजपलाच पाठिंबा

author img

By

Published : Oct 31, 2019, 7:36 PM IST

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व भाजपला समर्थन दिले.

अपक्ष आमदार प्रकाश आवाडेंचा भाजपला पाठिंबा

कोल्हापूर- इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत प्रकाश आवडे हे इचलकरंजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांचा परभव केला होता. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व भाजपला समर्थन दिले.

अपक्ष आमदार प्रकाश आवाडे कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लागले होते. मात्र, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत सरकार स्थापणेसाठी आपण भाजपला जाहीर पाठींबा देत असल्याचे प्रकाश आवाडे यांनी स्पष्ट केले. प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांचा पराभव केला होता.

प्रकाश आवाडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्य घेऊन विजय मिळविला होता. निवडणुकीच्या काही दिवस आधीच त्यांनी काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदाला रामराम करत अपक्ष निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होते. इचलकरंजी वासीयांनी भाजपच्या उमेदवाराला नाकारत मोठ्या मताधिक्याने अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे यांना निवडून दिले होते. मात्र, निवडूण आल्यानंतर प्रकाश आवाडे यांनी भाजपलाच पाठिंबा दिल्याने आता उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा- हाणामारीचे प्रकार घडत असतील तर गोकुळवर कारवाई करु - सहकारमंत्री

Intro:*ब्रेकिंग*

इचलकरंजी विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला भाजपला पाठिंबा

अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत दिला भाजपला पाठिंबा

अपक्ष आमदार प्रकाश आवाडे कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लागले होते लक्षBody:भारतीय जनता पक्षाला (BJP) देवेंद्र फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत सरकार स्थापणेसाठी जाहीर पाठींबा देत असल्याचे प्रकाश आवाडे यांनी केले स्पष्ट...

प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांचा पराभव करून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त मताधिक्य घेत विजय मिळविला आहे..

निवडणुकीच्या काही दिवस आधीच त्यांनी काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदाला रामराम करत अपक्ष निवडणूक लढविण्याचे केले होते जाहीर...

भाजपच्या उमेदवाराला इचलकरंजी शहराने नाकारत मोठ्या मताधिक्याने अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे यांना निवडून दिले... मात्र निवडणून आलेल्या प्रकाश आवाडे यांनी भाजपलाच पाठिंबा दिल्याने अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे... Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.